ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात 26 जानेवारी 2019 पासून लोकशाही पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून या निमित्ताने लोकशाही बळकट करण्याचा निर्धार पालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी केला. राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून नागरिकांनी निवडणूक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे व सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या निमित्ताने केले.महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात आज लोकशाही पंधरवडा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेवक नारायण पवार, अतिरिक्त आयुकत (2) समीर उन्हाळे, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, मुख्य लेख व वित्त अधिकारी मनेष वाघीरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.टी.केंद्रे, अधिष्ठातासौ. संध्य खडसे, उप नगर अभियंता रवींद्र खडताळे, सहाय्यक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर, डॉ.चारुशीला पंडीत, अनघा पगारे, शंकर पाटोळे, मारुती गायकवाड, झुंझार परदेशी, विजयकुमार जाधव, सचिन बोरसे, महेश आहेर, महादेव जगताप, वैद्यकीय अधीक्षक राजीव कोर्डे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
26 जानेवारी 2019 ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून या निमित्ताने पालिका क्षेत्रात विविध प्रसार माध्यमाच्याद्वारे लोकशाही,निवडणूक व सुशासन याविषयी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेत वेळोवेळी घटना दुरुस्ती करून लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे .73 वी व 74 वी घटनादुरुस्ती लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे.तसेच ज्या युवकांचे नाव मतदान यादीत समाविष्ट नाही त्यांनी तात्काळ आपले नाव नोंद करून लोकशाही बळकट करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे असेही आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे व सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.