कल्याण : ब्रिटिशांनी दुस-या महायुद्धात एरोड्रोमसाठी घेतलेल्या शेतजमिनी स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी परत दिल्या जात नसल्याने सरकारविरोधात नेवाळी जमीन बचाव आंदोलन समितीने २२ जूनला आंदोलन केले. याप्रकरणी शेतकºयांवर सरकारकडून अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ नेवाळी परिसरातील शेतकºयांनी श्रावणातील सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील बॅनरही त्यांनी नेवाळीनाक्यावर लावला आहे.नेवाळीनाक्यावर २२ जूनला शेतकºयांनी आंदोलन करताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे शेतकºयांनी पोलीस व खाजगी वाहनांची जाळपोळ व दगडफेक केली. तसेच पोलिसांना मारहाण केली. त्यात १२ पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले. त्याच्या बदल्यात पोलिसांनी शेतकºयांवर पॅलेट गॅनचा वापर करून गोळीबार केला. त्यात १४ शेतकरी जखमी झाले. पोलिसांनी हिललाइन व मानपाडा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी ३४ जणांना अटक केली. मात्र, त्यापैकी २७ जणांना अजूनही जमीन मिळालेली नाही. त्यांची रवानगी एक महिन्यापासून आधारवाडी कारागृहात आहे. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे गंभीर आहेत. शेतकºयांना जामीन द्यावा, या मागणीसाठी आगरी कोळी, कुणबी समाजाने मेळावा घेतला.शेतकरी कर्जमाफी सुकाणू समितीने त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्याची भाषा केली. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकºयांची भेट घेतली. विधिमंडळ अधिवेशनाचे काम बंद पाडण्याचा इशारा आमदार सुभाष भोईर यांनी दिला होता.नेवाळीचा प्रश्न लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्याचबरोबर भाजपा आमदार व खासदारांनी मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेतली. मात्र, त्यानंतरही काहीच साध्य झालेले नाही. शेतकºयांच्या पदरी पुन्हा आश्वासनेच पडली. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यांत सरकार व लोकप्रतिनिधींनी धूळफेक केली आहे.
सण साजरे न करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:26 AM