ठाणे : बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आठ जणांची आंतरराज्य टोळी गेल्या आठवड्यात गजाआड केल्यानंतर, पोलिसांनी या टोळीच्या आणखी दोन सदस्यांना अटक केली. या टोळीला दरोड्याचे साहित्य पुरवणाºया आरोपीचे नाव समोर आले असून बँक लुटण्याच्या तयारीसाठी आरोपींनी तीन वेळा गुप्त बैठका घेतल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.बँक आॅफ महाराष्ट्रच्या कासारवडवली शाखेत दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या आठ जणांच्या टोळीस अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने २२ जुलैला अटक केली होती. या टोळीतील आणखी दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून दोन्ही आरोपी नवी मुंबईतील तुर्भे येथे राहणारे आहेत. इतर आरोपींप्रमाणेच हे दोन्ही आरोपीही मूळचे झारखंडमधील आहेत. बरकत आदिल शेख आणि नाबीर लुकमान शेख ही त्यांची नावे आहेत.
दरोडेखोरांना शिताफीने अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:38 AM