ठाणे : वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरण आणि भूसृष्टीला मारक ठरू लागला आहे. यामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ठाण्यातील आदिवासीपाड्यात राहणाऱ्या एका अभियंत्याने मात्र या प्रदूषणाला आळा घालणारी यंत्रणा विकसित करून ठाण्याचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचे काम केले आहे. भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने या पेटंटला प्रमाणित केले असून त्यांचा हा प्रकल्प भारतासाठीच नव्हे तर जगासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.ठाण्यातील घोडबंदर रोड, गायमुख, कशेळी गावात राहणारे महेंद्र लोणारे यांनी 'अॅण्टी पोल्युशन सिस्टीम आॅन दी रोड' ही यंत्रणा विकसित केली आहे. रस्त्यांवरून धावणाºया गाड्यांमधून जो घातक घटक धुरामधून बाहेर पडतो, त्या धुराला ही यंत्रणा नष्ट करणार आहे. मेकॅनिकल इंजिनीअर असणारे महेंद्र यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ‘अॅण्टी पोल्युशन सिस्टीम आॅन दी रोड‘ या प्रकल्पावर संशोधन सुरू होते. जिथे वाहनांची वर्दळ अधिक आहे, अशा ठिकाणी किंवा वाहने धावणाºया रस्त्यांवर ही यंत्रणा बसविल्यास तेथे चालू गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर शोषला जाऊन त्यातील विषारी घटक नष्ट केले जाणार आहेत.९० टक्के कार्बनडायआॅक्साइडहोणार नष्टशहरातील मोठे सिग्नल, चौक किंवा जिथे वाहनांची जास्त वाहतूक आहे, अशा ठिकाणी अथवा रस्त्यांच्या दुभाजकांच्या जागेत हा प्रोजेक्ट राबविता येतो. १०-१२ फूट उंच कारंजासारखे पाण्याचे फवारे उडवून त्याठिकाणी गाड्यांमधून निघणाºया धुरातील विषारी घटक शोषले जाऊन एका टाकीत जमा होणार आहेत. धुरातील वायूचे विषारी कण पाण्यात मिसळून पाणी रिसायकल होणार आहे.हा प्रकल्प ज्या ठिकाणी लावला जाईल, तेथील ९० टक्के कार्बनडायआॅक्साइड आणि इतर विषारी पदार्थ या ठिकाणी नष्ट करता येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकल्पाचे भारत सरकारकडून त्यांना पेटंट मिळाले असून अगदी कमी खर्चात हे प्रकल्प ठिकठिकाणी उभे केले जाऊ शकतात.>गाड्यांमधून निघणारा धूर ही जागतिक समस्या बनली आहे. भारतासारख्या देशाला ही समस्या जास्तच भेडसावणारी आहे. गाड्यांचा वापर अनिवार्य झाला असल्याने त्यांच्यातून निघणाºया विषारी घटकांचा प्रदूषणावर वाईट परिणाम होत आहे. गाड्यांची वाहतूक थांबविता येऊ शकत नाही, पण त्यामधून तयार होणारे प्रदूषण कमी करता येईल का, यावर विचार करत होतो. त्यातूनच ही यंत्रणा उभी केली. अगदी कमी खर्चात ही यंत्रणा उभी करता येऊ शकते. पाण्याच्या कारंजामधून ती कार्यान्वित होत असून, तो परिसरही सुशोभित दिसतो.- महेंद्र लोणारे
आदिवासीपाड्यात राहून विकसित केली ‘अॅण्टी पोल्युशन सिस्टीम’, भारत सरकारने दिले पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 1:46 AM