शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

विकासकाला ७३ लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:48 AM

नौपाड्यातील महाजन सोसायटी या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम मिळवून देतो, अशी बतावणी दलालीचे काम करणाºया स्वस्तिक गार्डन, सुभाषनगर येथील काळे याने शेख या बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती.

ठाणे : पुनर्विकासाचे काम मिळवून देतो, अशी बतावणी करून जाफर शेख (५५, रा. नागपाडा, मुंबई) या विकासकाला ७३ लाख १० हजार रुपयांचा गंडा घालणा-या जयंत काळे (रा. सुभाषनगर, ठाणे) या भामट्याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाड्यातील महाजन सोसायटी या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम मिळवून देतो, अशी बतावणी दलालीचे काम करणाºया स्वस्तिक गार्डन, सुभाषनगर येथील काळे याने शेख या बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती. महाजन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशीही तसे बोलणे झाल्याचे त्याने भासवले. त्यानंतर, आॅक्टोबर २०१७ ते २५ फेब्रुवारी २०१९ या दोन वर्षांच्या काळात काळे याने महाजन सोसायटीचे लेटरहेड बनवून त्यावर सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या बनावट स्वाक्षºयाही करून पुनर्विकासासाठी अनुमती असल्याचा दावा केला. त्यानंतर, या सोसायटीच्या वतीने वृत्तपत्रांतही जाहिरात प्रसिद्ध करून बांधकाम व्यावसायिक शेख यांचा विश्वास संपादन केला. सोसायटीची पुनर्विकासाला अनुमती असल्याचा शेख यांनीही समज करून काळे याने सांगितल्याप्रमाणे त्याला आरटीजीएसद्वारे ७३ लाख १० हजारांची रक्कमही दिली. ठरल्याप्रमाणे शेख यांनी या इमारतीच्या पुनर्विकासासाठी काळे याच्याकडे तगादा लावल्यानंतर मात्र तो वेळकाढूपणा करत होता. अखेर, शेख यांनी या इमारतीच्या सभासदांकडे चौकशी केली असता, सोसायटीचा पुनर्विकास सध्या करायचा नसल्याची माहिती समोर आली. अखेर, सोसायटीच्या पुनर्विकासासाठी सभासदांनी इमारत रिकामी करण्यासाठी काळे याच्याकडे त्यांनी तगादा लावला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज केला.२८ जूनला ताब्यातसोसायटीचे अध्यक्ष माधव जोशी व सचिव अविनाश भोळे यांनीही विकासक शेख यांना काळे याने दिलेले लेटरहेड आणि त्यावरील स्वाक्षºया या बनावट असल्याचे सांगितले. हा प्रकार उघड झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. ओऊळकर आणि हवालदार व्ही.एस. सूर्यवंशी यांच्या पथकाने काळे याला अखेर २८ जून रोजी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी