ठाणे : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले येथील हरिनिवास सर्कल ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. शेकडो कबुतर एकत्र येऊन येथे सध्यास्थितीला नवा कबुतरखाना विकसीत होऊ पाहात आहे.भर रस्त्यात दाणे टिपणारे, बागडणारे कबुतरांच्या या थव्यातून वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मार्ग काढत पुढे जावे लागत आहे.या नव्याने विकसित होत असलेल्या कबुतरखान्याने तेथील संपूर्ण पदपथ तसेच रस्त्याचा अर्ध्यापेक्षा अधिकभाग या कबुतरांनी व्यापलेला असतो. यामुळे येथून येजा करणाऱ्या नागरिकांप्रमाणेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिलांना चक्क मोकळी जागा शोधत वाट काढावी लागत आहे. याशिवाय येथे सर्व प्रकारच्या वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून बसेस, दुचाकी येजा करीत असतात. त्यांना ही कबुतराना चूकवून पुढची वाट धरावी लागत असल्याचे वास्तव प्रत्यक्षदर्शी जेष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी लोकमतच्या निदर्शनात या थव्यातील बहुतेक कबुतरे अचानकपणे दुचाकीस्वारास धडकतात. या दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होताना दिसून येतो. काही विशिष्ट समाजाच्या भूतदयेपोटी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असून या कबुतरांचा सहवासामुळे जीव घेण्या आजारास सामोरे जावे लागत असल्याचे मोने यांनी पनवेल महापालिकेच्या जनजागृती निवेदनावरून नमुद केले. या कबुतरांच्या विष्ठेपासून येथून येजा करणाऱ्यांना विद्यार्थ्यांस जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मोने यांनी निदर्शनात आणून दिले आहे. यावर ठाणे महापालिकेने देखील वेळीच गांभीर्याने विचार करण्याचे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठाणे शहराचे मध्यवर्ती हरिनिवास सर्कलला नव्या कबुतरखान्याचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 6:34 PM
या नव्याने विकसित होत असलेल्या कबुतरखान्याने तेथील संपूर्ण पदपथ तसेच रस्त्याचा अर्ध्यापेक्षा अधिकभाग या कबुतरांनी व्यापलेला असतो. यामुळे येथून येजा करणाऱ्या नागरिकांप्रमाणेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिलांना चक्क मोकळी जागा शोधत वाट काढावी लागत आहे. याशिवाय येथे सर्व प्रकारच्या वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून बसेस, दुचाकी येजा करीत असतात. त्यांना ही कबुतराना चूकवून पुढची वाट धरावी लागत
ठळक मुद्देशेकडो कबुतर एकत्र येऊन येथे सध्यास्थितीला नवा कबुतरखाना विकसीत रस्त्याचा अर्ध्यापेक्षा अधिकभाग या कबुतरांनी व्यापलेलाबहुतेक कबुतरे अचानकपणे दुचाकीस्वारास धडकतात