डोंबिवली: राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय खात्यांतर्गत कल्याण ग्रामिणमध्ये रस्त्यांच्या कामासह तलाव सुशोभिकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आठवडाभरात ती कामे सुरुवात होणार असून त्यात प्रामुख्याने बाळे गणपती मंदिर गाव तलाव सुशोभिकरणासाठी शासनाने ५० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार सुभाष भोईर यांनी दिली.हा निधी मंजूर होण्यासाठी भोईर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानूसार बाळेगावसह वाकळण, वडवली, पिंपरी, शिरढोण आदी गावांमध्येही विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. त्यात वाकळण आदिवासी ते ठाकूरपाडा रस्ता तयार करणे, वाकळण भोईरपाडा रस्ता तयार करणे, पिंपरी गोसिया मार्केट रस्ता तयार करणे, वडवली व शिरढोण गावांतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, गटारे, सीसी रोड आदी कामे करणे यासाठी प्रत्यकी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासह खोणी गावातील तलाव सुशोभिकरण करणे, खोणी मुख्य रस्ता स्व. धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार रे वस स्थानक रस्ता डांबरीकरण करणे या कामांसाठी प्रत्येकी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे या परिसरात राहणा-या असंख्य नागरिकांना दिलासा मिळणार असून चांगले रस्ते, तलाव सुशोभिकरण माध्यमातून पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न असेल असेही आमदार भोईर म्हणाले. या संदर्भात ३१ मोर्च रोजी आदेश पारित झाले असून त्याचा तपशील दोन नुकताच मिळाल्याचेही ते म्हणाले.
अडीच कोटींच्या निधीतून कल्याण ग्रामिणमध्ये विकासकामे - आमदार सुभाष भोईर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 5:21 PM
राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय खात्यांतर्गत कल्याण ग्रामिणमध्ये रस्त्यांच्या कामासह तलाव सुशोभिकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आठवडाभरात ती कामे सुरुवात होणार असून त्यात प्रामुख्याने बाळे गणपती मंदिर गाव तलाव सुशोभिकरणासाठी शासनाने ५० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार सुभाष भोईर यांनी दिली.
ठळक मुद्दे वाकळण-वडवली-पिंपरी-शिरढोण-खोणीमध्ये रस्ते सुविधाबाळेगाव तलावासाठी ५० लाख रूपये