शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचा पॅटर्न दाखवून द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:36 AM

डोंबिवली : कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ...

डोंबिवली : कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसैनिक तथा माजी परिवहन सभापती राजेश कदम यांनी फडणवीस यांना ट्विट करून नागपूरमध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. नुसती टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न, जबाबदारीने काहीतरी केलेत तर तुमचा डोंबिवलीच्या आप्पा दातार चौकात म्हणजेच फडके पथावर भव्य सत्कार ठेवू, अशा शब्दांत कदम यांनी त्यांना काेपरखळी मारली आहे.

नागपूरमध्ये सध्या ४० हजार ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. दररोज येथे तीन ते चार हजार रुग्णांची भर पडते आहे. तेथे भाजपची सत्ता आहे. तुमचे प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नारायण राणे, किरीट सोमय्या, छोटा राणे, गोपीचंद पडळकर, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये या सर्व काेराेना तज्ज्ञांना नागपूरमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली घेऊन जा. लागल्यास इतर छोट्या-मोठ्या पक्षातीलपण अनेक तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मदतीने नागपूरमध्ये कोरोनावर एक महिन्यात नियंत्रण मिळवून दाखवा, कारण या सर्व तज्ज्ञ मंडळींकडे अनेक उपाय आहेत. महाराष्ट्राला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही फक्त राजकारण करत आहात. सत्ता काय येते जाते. तुमच्याच काय तुमच्या अनेकांच्या स्वप्नातही नव्हते की पाच वर्षांत तुमची सत्ता जाईल म्हणून. आज मराठी माणूस कोरोनाच्या भयंकर विळख्यात आहे. कोरोना बघत नाही की हा भाजपचा आहे की शिवसेनेचा अशा शब्दांत कदम यांनी ट्विटद्वारे फडणवीस यांना सुनावले आहे. कदम यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

तुम्ही फडणवीस पॅटर्न मिरवा

रेल्वे, देऊळ, बस, दुकाने, फेरीवाले व इतर सर्व आस्थापना बंद न करता, लॉकडाऊन न करता काेराेना घालवण्याच्या तुमच्याकडे १०१ आयडिया आहेत. विशेषत: मोदी सरकारची मदत घेऊन दाखवून द्या संपूर्ण जगाला हा फडणवीस कसा चमत्कार घडवताे ते. महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महापालिका अभिमानाने धारावी पॅटर्न सांगते तसेच तुम्हीही नागपूरवर नियंत्रण मिळवले तर फडणवीस पॅटर्न म्हणून तुमचे कौतुक करू.

------------------------------------------------------