ठाणे : धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने खास धनगर समाजातील महिलांसाठी ‘चला खेळुया मंगळागौर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चाललंय. तरीदेखील काही संस्थांनी मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतच असतो मात्र शरीराला व्यायामही होतो. आता महिला नोकरी करणाऱ्या असल्यामुळे मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु हा पारंपरिक खेळ टिकला पाहिजे यासाठी धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘चला खेळुया मंगळागौर’ कार्यक्रम आयोजित केला होता याचे उदघाटन नगरसेविका नंदिनी विचारे,नगरसेविका परीषा सरनाईक,समाजसेविका तनुजा वीरकर,भारती चौगुले,नगरसेविका प्रतिभा मढवी,नम्रता कोळी यांच्या हस्ते झाले यावेळी माजी नगरसेविका विशाखा खताळ,उद्योजिका उज्वला गलांडे,नारी शक्ती ब्रिगेड अध्यक्षा निर्मला पाल,यशवंत सेना ठाणे जिल्हा संघटक ज्योती भंडारे,मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर,उपाध्यक्ष सुजाता बुधे, सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,आदी यावेळी उपस्थित होते."नखुल्याबाई नखुल्या, चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली, "किस बाई किस दोडका किस, दोडक्याची फोड लागते गोड',झिम पोरी झिम अशी अनेक गाण्यांवर महिलांनी खेळ खेळून मंगळागौर साजरा केला. यावेळी मंगळागौर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉ द्वारे पैठणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती समाजसेविका तनुजा वीरकर यांच्या हस्ते रेशमा लबडे यांना लकी ड्रॉ पैठणी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपखजिनदार संगीता खटावकर,सदस्य अश्विनी पळसे,रतन वीरकर, सुचिता कुचेकर,सुषमा बुधे,स्नेहा खटावकर,सीमा कुरकुंडे,सुजाता भांड,सल्लागार अर्चना वारे,मीना कवितके तसेच धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव अमोल होळकर, खजिनदार अविनाश लबडे,उपाध्यक्ष संतोष बुधे, प्रचारप्रमुख कुमार पळसे, कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,सुरेश भांड,सल्लागार सुनील राहिंज, प्रसाद वारे,मनोज खाटेकर,महेश पळसे आदींनी परिश्रम घेतले.