लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शासकीय आस्थापना असणाऱ्या महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा कुटील डाव रचून, त्याद्वारे वीज दरवाढी करण्याचे हे कारस्थान राज्य शासनाचे असल्याचा आराेप करीत त्याच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षाच्या वरिष्ठ पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी आज एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदाेलन छेडले.
येथील शासकीय विश्रामगृहाजवळ एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली या वीज दरवाढीचे आंदाेलन छेडले. यावेळी आंदाेलनकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांनी विविध मागण्यांचे निवदेन त्यांना दिले. या आंदाेलनात पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांच्यासह, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, विनोद मोरे, राज्य महिला समन्वयक रेश्मा पवार, अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, मनीषा सांडभोर, भावना ओरपे, जयश्री भवाळकर, दिनेश चिकणे आदींचा समावेश हाेता.
अन्यायकारी वीज दरवाढ सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांसह छोटे उद्योगांचे कंबरडे मोडणारी असल्याचा आराेप या कार्यकर्त्यांनी केला. वीज दरवाढीचा हा प्रस्ताव ३७ टक्क्यांएवढा असून, पुढच्या वर्षी आणखी १५ टक्क्यांच्या अतिरिक्त दरवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी लक्षात आणून देत त्यांनी शासनाच्या या अन्यायकारक निर्ण् या विराेधात आंदाेलन केले. पुढील दोन वर्षांत सुमारे ६७ हजार कोटी रुपयांचा तोटा भरुन काढण्यासाठीच ग्राहकांच्या माथी वीज दरवाढ मारण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात नमुद केले. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत, तब्बल ५० लाख युनिट इतकी प्रचंड वीजचोरी उघडकीस आलेली आहे. याला सर्वस्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा व अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचा आरोपही या आंदोलकांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"