शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

अवघ्या दोन तासांत होणार क्षयरोगाचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 11:52 PM

विनामूल्य चाचणी : अत्याधुनिक सीबीनॅट कार्यान्वित

ठाणे : क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाकरिता त्याचे अचूक व त्वरित निदान होण्यासाठी ठाणे महानगरपालिका व इंडियन आॅइल यांच्या सहकार्याने सी.आर. वाडिया हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सीबीनॅट मशीन मंगळवारी कार्यान्वित करण्यात आली. यावेळी क्षयरोगावर मात करत शालान्त परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमाला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरु द्ध माळगावकर, उपवैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, क्षयरोग अधिकारी खुशबू टावरी, इंडियन आॅइलचे महाप्रबंधक (सीएसआर) सुबीर श्रीवास्तव, वरिष्ठ प्रबंधक सौम्या आनंद बाबू, वाडिया हॉस्पिटलचे डॉ. कृष्णमूर्ती, डॉ. श्रीमती सोनावणे, डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. ज्योती साळवे आदी उपस्थित होते.

सीबीनॅट मशीनमुळे क्षयरोगाचे निदान अवघ्या दोन तासांत होणार आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये २५00 ते ३000 रु पये इतका खर्च असणारी ही चाचणी वाडिया हॉस्पिटलमध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर ठाण्यातच ही मशीन कार्यान्वित करण्यात आली असून या मशीनवर एकावेळी ८ रूग्णांच्या क्षयरोगाची चाचणी करता येऊ शकते. खाजगी हॉस्पिटलमधील रुग्णांची चाचणीदेखील येथे मोफत करण्यात येणार असून जास्तीतजास्त रूग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्षयरोगाचे वेगवान निदान करण्याकरिता सीबीनॅट उपयुक्त ठरणार आहे. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी पूर्ण कालावधीसाठी (सहा महिने किंवा अधिक) उपचार घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्वरित उपचार चालू केल्यास रूग्णासाठी फायद्याचे असून त्याच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यताही कमी होते.यशवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारक्षयरोगाची लागण होऊनदेखील इयत्ता दहावी, बारावी शालान्त परीक्षेत यश मिळवलेल्या ठाणे महापालिका परिसरातील विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गंभीर आजारावर मात करत वेळेवर औषधोपचार घेऊन हे यश संपादन केले आहे.

टॅग्स :thaneठाणे