शहरं
Join us  
Trending Stories
1
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
2
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
3
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
4
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
5
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
6
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
7
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
8
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
9
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
10
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...
11
तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'
13
संस्कार आपापले! मोदी आणि राहुल गांधींच्या संसदेतील वर्तनाची तुलना करत भाजपाने लगावला टोला
14
“राज्यातील भ्रष्ट महायुतीला हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा”: रमेश चेन्नीथला
15
Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार
16
काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंनी दिलगिरीचे पत्र दिले; म्हणाले, सभागृहातही तयारी....
17
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
18
हार्दिक ऑन टॉप! 'चॅम्पियन' पांड्याला ICC ने दिली खुशखबर; वर्ल्ड कपमधील कामगिरीचे बक्षीस
19
Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!
20
हेमंत सोरेन यांना 6 महिन्यांनंतर जामीन; पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार...

मुख्यमंत्र्यांनी ५० लाख देऊन राकेश यादवच्या जिवाची किंमत मोजली का? राजन विचारे यांचा आरोप

By धीरज परब | Published: June 25, 2024 8:29 PM

Mira Road: सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

 मीरारोड - सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. प्रत्यक्षात ३५ लाख रुपये एल एन्ड ती कंपनीने दिलेले आहेत . पण गाजावाजा मात्र मुख्यमंत्र्यांनी असा केला जणू ५० लाख त्यांनी स्वतःच्या खिशातून दिले आहेत असा टोला विचारे यांनी लगावला.

नायगावच्या हद्दीत वरसावे खाडी पुलाजवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे . शाफ्टच्या कामा दरम्यान पोकलेन  चालक राकेशकुमार यादव हा २९ मे रोजी बाजूचे काँक्रीट ब्लॉक व माती कोसळून ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे .  परंतु महिना झाला तरी यादव याचा शोध शासन आणि राज्य व केंद्रातील यंत्रणांना घेता आलेला नाही . कारण यादव हा गरीब चालक असल्याने त्याचा मृतदेह काढण्यास सरकार अनुत्सुक असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी घटनास्थळी भेट देऊन केला आहे.

सोमवारी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि माजी खा . विचारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन शोधकार्याची माहिती घेतली . यावेळी एम एम आर डी अभियंता कुणाल शेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , संपर्कप्रमुख नरेश मणेरा, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, माजी नगरसेवक प्रवीण पाटिल, उपशहर प्रमुख राजू ठाकुर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, संजय दळवी, अमोल हिंगे आदी उपस्थित होते.

राकेशकुमार यादव याचा अजून शोध लागला नसल्याने त्याच्या प्रतीक्षेत त्याची पत्नी व कुटुंबीय उघड्यावरच बसलेले होते त्यांची चतुर्वेदी व विचारे यांनी भेट घेतली . यावेळी यादव याच्या पत्नीने अश्रू अनावर होत आपली व्यथा मांडली .  यादव याच्या कुटुंबीयांना थांबण्यासाठी निदान कंटेनरची व्यवस्था करा आणि शोधकार्यची गती वाढवा अशी मागणी एमएमआरडीए कडे केली . 

यादव कुटुंबियांना ५० लाखांची मदत केल्याचा गाजावाजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवला असला तरी त्यातील केवळ ३५ लाखांचा धनादेश दिला असून तो देखील एल एन्ड टी कंपनीने केलेली मदत आहे . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिश्यातुन मदत केली आहे का ? हे सांगावे . तर विम्याचे १५ लाख रुपये अजून यादव कुटुंबियांना मिळणे बाकी असून ते त्यांना तात्काळ दिले जावे अशी मागणी विचारे यांनी केली . 

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणेrajan vichareराजन विचारे