लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : अवकाळी पावसामुळे शेती, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याप्रकरणी महसूल विभागाने मीरा-भार्इंदरमधील ३२० शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यासाठीच्या भरपाईची साडेसात लाखांची रक्कमही मंजूर झाली. परंतु, सातबारा नोंदीत कुटुंबातील अनेकांची नावे असून त्यांची आपसात सहमती होत नसल्याने केवळ २५ एकेरी खातेधारक शेतकºयांनाच भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. तर, २९५ जणांना वंचित राहावे लागणार असून सरकारचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळे मीरा-भार्इंदरमधील उत्तन, डोंगरी, तारोडी, पाली, राई, मुर्धा, मोर्वा, चेणे, काजूपाडा आदी भागांतील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. कापणी करून ठेवलेले तर काहींचे हाताशी आलेले उभे भातपीक कुजून गेले. लागवड केलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. आधीच शेती, भाजीपाला लागवडीसाठी होणाºया खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही बहुतांश शेतकरी हे आपली पिढीजात शेती टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. घरच्यापुरते तरी धान्य मिळावे, या आशेने शेती करणारेही अनेक आहेत. काही जणांची शेती मालकीची नसली, तरी अनेक वर्षांपासून कसत आहेत.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी, अशी आशा शेतकºयांना वाटू लागली. त्या अनुषंगाने महसूल विभागाने पंचनामे सुरू केल्यानंतर त्यावेळीही सातबारा नोंदी असलेल्या अनेकांच्या नावांचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, तलाठ्यांनी शेती कसणाºयाचे जबाब तसेच पंच यांची नोंद घेऊन पंचनामे तयार केले. त्यामुळे निदान ३२० शेती नुकसानीचे पंचनामे झाले.या पंचनाम्यानुसार आता किमान एक हजार ते कमाल आठ हजारनुसार सात लाख ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना देण्यासाठी मंजूर झाली आहे. त्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अपर तहसीलदार कार्यालयाने पंचनामे व झालेल्या मंजुरीनुसार एकेरी खातेधारक असलेल्या २५ प्रकरणांत ४८ हजारांची नुकसानभरपाई थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, २९५ नुकसानभरपाई प्रकरणांत निधी मंजूर झाला असला, तरी सातबारा नोंदी एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने आता ही रक्कम कुणाच्या खात्यात जमा करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानभरपाई मिळवायची असल्यास अन्य खातेधारकांचे सहमतीपत्र घ्यावे लागणार आहे.सहमतीपत्रासाठी करावी लागणार कसरतबहुतांश शेतकºयांना शेतीच्या क्षेत्राच्या अनुषंगाने नुकसानभरपाईची मिळणारी रक्कम ही एक ते चार हजारांच्या घरात असेल. पण, कसणाºयास अन्य खातेधारकांची सहमतीपत्रे आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवाय, कौटुंबिक बेबनाव, वादाचे प्रकार असल्याने अशी सहमतीपत्रे मिळणे बहुतेकांना अवघड जाणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी आलेलीमदतीची सुमारे सात लाखांची रक्कम परत जाण्याची शक्यता आहे.
अनेक खातेधारकांमुळे भरपाई देण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:26 PM