ठाणे : येत्या डिसेंबर महिन्यात दिघा स्थानकाच्या कामाच्या निविदा काढण्याचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरु वात होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना प्रोजेक्ट डायरेक्टर एस.एस. खुराना यांनी मंगळवारी दिली.दुसºया टप्प्यातील या प्रकल्पात बाधित होणाºया झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी खर्च होणारी रक्कम जिल्हाधिकाºयांकडून निश्चित झाल्यानंतर ती रेल्वेकडून शासनाकडे जमा करून सदर जागा भूसंपादित करून निविदा काढण्यात येतील. त्यानंतर, त्यांचे एमएमआरडीएच्या माध्यमातून पुनर्वसन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ठाणे स्थानकावरील अतिरिक्त पडणारा भार कमी करण्यासाठी नव्याने मंजूर झालेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऐरोली- कळवा एलिव्हेटेड या रेल्वेच्या नवीन मार्गाच्या कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी चर्चगेट येथील एमआरव्हीसीच्या कार्यालयात प्रोजेक्ट डायरेक्टर खुराना यांची विचारे यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी सर्वप्रथम या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने नाराजी व्यक्त केली. हे प्रकल्प सुरू झाले असते तर प्रवाशांची सोय झाली असतती.सद्य:स्थितीत ठाणे-वाशी मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता व इतर स्थानकांतून ठाणे स्थानकात होणारी गर्दी रोखण्यासाठी तसेच नुकत्याच एल्फिन्स्टन येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये, यासाठी कर्जत-कसारा ते वाशी ही लोकल ऐन गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी व संध्याकाळी मुकंद कंपनीला लागून असणाºया मालगाडीच्या रेल्वे रूळांवरून सुरू करावी, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे प्रबंधक एस.के. जैन यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. ही सेवा सुरूझाल्यास कल्याण-अंबरनाथ-बदलापूर, कर्जत-कसारा येथील प्रवाशांना थेट नवी मुंबईला जाता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ठाणे स्थानकातील बंद अवस्थेत असलेल्या पार्किंग प्लाझाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर लागणारा शेवटचा गर्डर टाकण्यासाठी लवकर मेगाब्लॉक घ्यावा, या मागण्याही त्यांनी या निवेदनात केल्या आहेत.
नवीन वर्षात दिघा स्थानकाचे काम सुरू होणार - विचारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:23 AM