शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 9:47 PM

Thane News : डिजीठाणेने राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.

ठाणे - भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा २०२०" मध्ये ठाणे महापालिकेच्या 'डिजी ठाणे' या डिजिटल प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कोरोना काळात प्रकल्पांची अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या संदर्भातील कामगिरीचे धोरण, प्रकल्प आणि संकल्पना या मापदंडांवर मूल्यमापन करण्यात आले असून यामध्ये अग्रणी ठरणाऱ्या शहरांना आयएससीएच्यावतीने सन्मानित करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी दोन टप्प्यांमध्ये अनेक कसोट्यांवर मूल्यमापन करण्यात आले. एकूण १०० सहभागी प्रकल्पांपैकी केवळ ५० स्मार्ट सिटी प्रकल्पांची कोविड-१९ साथीच्या कालखंडात अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे प्रकल्पाला ‘प्रशासन’ श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.

डिजीठाणेने राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. त्याचबरोबर, डिजीठाणे प्रकल्पाने कोरोना साथीच्या कालखंडात ब महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे, थमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनविण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी २५,००० नागरिकांनी या ऑनलाईन स्व-चाचणी टूलचे  वापर करून महानगरपालिकेला सक्रिय पद्धतीने  कार्यक्षमता वाढवणे, महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत केली आहे.  

डिजीठाणेच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात अद्ययावत आकडेवारी देणारा डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामध्ये पॉजिटीव्ह रुग्ण, रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या, मृत्यूदर, एम्ब्युलन्स सेवा इत्यादींच्या अद्ययावत माहितीमुळे कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सहाय्य झाले आहे. या डॅशबोर्ड ला ४५,००,००० नागरिकांनी भेट दिली आहे.  नागरिकांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे तपासणीची मोफत सुविधा डीजी ठाणेच्या माध्यमातून करण्यात आली होती.        तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून डिजीठाणे कोव्हिड-१९ डॅशबोर्डच्या संकेतस्थळावर विसर्जनाची टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करण्यासाठी २५,००० पेक्षा जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात लागू असलेल्या संचारबंदी चे पालन करताना अत्यावश्यक प्रवासासाठी डीजीठाणे प्रणालीद्वारे जवळपास १०,००० नागरिकांनी आपले योग्य कारण नोंदवून ई-पास साठी अर्ज दिले होते. तसेच झोमाटो व वेलनेस फॉरएवर बरोबर भागीदारी करून डीजीठाणे द्वारे १५,००० सुरक्षित रित्या औषधे व अत्यावश्यक वस्तूंचे घरपोच सेवा देण्यात आली होती.  

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने यशस्वीरीत्या राबविण्यात येणारा डिजीठाणे हा डिजीसिटी प्लॅटफॉर्म सर्वाधिक संवादी(interactive) पद्धतीने कार्यरत असणारे वेब पोर्टल आणि मोबाईल एप्लिकेशन ठरले आहे. ठाणे स्मार्ट सिटीज लिमिटेडने उत्कृष्ट कामगिरी केली असून सरकार, स्थानिक व्यवसाय यांच्यात वाढलेली डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सहकार्य ही उद्दिष्टे साध्य केली आहेत. नागरिकांद्वारे सरकार ते नागरिक, व्यवसाय ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक सेवा देण्यात डिजी ठाणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ठाणे महापालिकेच्या नव्या वेगवेगळ्या योजनांबरोबरच  ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडीचीही माहिती तात्काळ उपलब्ध् करुन दिली जात आहे. आरोग्याबद्दल सजग असलेल्या ठाणेकरांना आरोग्य उत्तम राखण्यातही डिजीठाणेचे सहाय्य होत असून शैक्षणिक माहितीही याद्वारे उपलब्ध होत आहे.         प्रदूषण नियंत्रण, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वीज बचत, आरोग्य आदी महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये नागरिक तसेच युवक यांचा सहभाग वाढविण्यासाठी डीजी ठाणेच्या माध्यमातून काही प्रोत्साहनपर योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे नागरिक आणि शासन यांमध्ये संवादमाध्यम उपलब्ध झाले आहे तसेच स्थानिक व्यावसायिकांनादेखील एक व्यासपीठ मिळाले आहे. या सर्व उपक्रमाला  ठाणेकरांनी  उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच डिजी ठाणेचा सन्मान हा राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाIndiaभारत