- नितीन पंडितभिवंडी - भिवंडीतील माणकोली अंजुर फाटा ते चिंचोटी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे.स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी व आंदोलने करून देखील या रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे दुर्लक्ष झाले असल्याने हा रस्ता मृत्यूचे सापळे बनला असून या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत.
या अपघातग्रस्त रस्त्याची पावसाळ्या आधी दुरुस्ती व्हावी,जो पर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तो पर्यंत टोल वसुली बंद करावी,रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे,एमएमआरडीए मार्फत रस्त्याचे कोंक्रेटिकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करावे या मागणीसाठी माणकोली,खारबाव,कामण,चिंचोटी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी एकत्र येत गाव विकास समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून २९ मार्च २०२३ रोजी खारबाव नाका येथे सकाळी ९ वाजल्या पासून समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य ओम मुकादम,अशोक पालकर,नितीन पाटील,प्रशांत म्हात्रे यांनी दिली असून यासंदर्भातील लेखी निवेदन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग ,महसूल व पोलीस प्रशासनाला दिले असल्याची माहिती ओम मुकादम यांनी दिली आहे.