भिवंडी : भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावर माल वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली करण्यात येते, मात्र रस्त्याच्या देखभाल व दुरुस्थिकडे टोल वसूल करणाऱ्या कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.
मागील काही दिवसांपासून भिवंडीत मुसळधार पाऊस पडल्याने या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्याने कंपनीने थातूर मातूर कारवाई करत खडीमिश्रित मातीने रस्त्यांचे खड्डे भरले होते मात्र आता हि माती बाजूला झाल्याने रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.
या रस्त्याच्या कंत्राटदारांकडू बहात्तर गाळा ते महेश कॉरी दरम्यान रस्त्याची डागडुजी जेली होती तर वडघर व खारबाव येथीही तात्परते खड्डे भरले होते मात्र आता या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.मुख्य नाका असलेल्या अंजुरफाटा व मानकोली नाक्यावर देखील खड्डे पडल्याने वाहन चालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.