लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोटारसायकलची चोरी करून ती एका वाहनामध्ये भरून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या उदय देशमुख (३१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आण िविकास किसन फटांगळे (३३, रा. जय भवानीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना गस्तीवरील वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतेच रंगेहात पकडले. त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकलही हस्तगत केली आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट रोड क्र मांक १६ येथील तुळजा भवानी मंदिरासमोर ६ जून २०२१ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट पोलिसांचे गस्तीपथक जात होते. त्याचवेळी दोघे संशियत आरोपी एका ओमनी व्हॅनमध्ये मोटारसायकल भरून घेऊन जात असतांना त्यांनी रंगेहात पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निकुंभ, जमादार पवार, पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक थोरात, जाधव, शेलार आण िपोलीस अंमलदार बर्ले आदींच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. तेव्हा ही मोटारसायकल व्हॅनमधून रायगड येथे ते घेऊन जात असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याविरूद्ध प्रथम सीआरपीसी ४१ (१) (ड) प्रमाणे कारवाई केली. नंतर मोटारसायकल क्र मांकाच्या आधारे तक्र ारदाराचा शोध घेऊन या दोघांविरूद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. या दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मोटारसायकल चोरणाऱ्या दुकलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:18 AM
मोटारसायकलची चोरी करून ती एका वाहनामध्ये भरून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या उदय देशमुख (३१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आण िविकास किसन फटांगळे (३३, रा. जय भवानीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना गस्तीवरील वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतेच रंगेहात पकडले.
ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई मोटारसायकल जप्त