ठाणे: सैनिक कल्याण अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क मधील सरळसेवेतील कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक, शारिरिक प्रशिक्षण निदेशक व वसतिगृह अधीक्षिका या पदांकरिता भरती परीक्षा टि.सी.एस. आयओएन यांच्या एजन्सीमार्फत राबविण्यात येणार आहे. या भरतीकरीता सविस्तर जाहिरात, सूचना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ३ मार्चपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर वेबलिंक बंद होणार असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. यास अनुसरून ठाणे,पालघर जिल्ह्यातील संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे,पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (नि.) यांनी केले आहे.