मीरारोड - काशीमिरा उड्डाणपुलाखाली उद्यान, सालासार उद्यानाची पाहणी करून उद्याने व दुभाजकां मध्ये विविध जातीच्या फुलझाडांची व शोभिवंत झाडांची लागवड करण्यास आयुक्त दिलीप ढोले यांनी वॉक विथ कमिश्नर अभियान दरम्यान पाहणी वेळी सांगितले.
आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड व कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत शहरातील विविध भागांची पाहणी केली . भाईंदर पश्चिम उड्डाणपुलाखाली प्रगतीपथावर असलेले सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष व पशू वैद्यकीय दवाखानाची पाहणी केली. साफसफाई व रंगरंगोटी करण्यास सांगितले.
सालासर उद्यानातील कारंजे तातडीने चालू करणे, वाढता उन्हाळा पाहता झाडांना नियमित पाणी देणे, मातीची गुणवत्ता सुधारणे, दुभाजकांची रंगरंगोटीचे करण्यास सांगितले. रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर पडलेले डेब्रिज - माती तसेच ठेवलेल्या कचरा कुंड्या व गटार सफाईचा गाळ तातडीने उचलण्याचे निर्देश दिले. गटारांची तुटलेली झाकणे नव्याने बसवा व रस्ता ते पदपथ दरम्यानच्या भागाचे डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी साफसफाई ठेवावी व फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या, खाद्यविक्रेते यांच्याकडून अस्वच्छता पसरत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास आयुक्त ढोले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले .