मुरबाड : शासकीय-निमशासकीय कर्मचाºयांनी निवडणुकीचे काम नाकारल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निवडणूक आयोगाचे आदेश असतानाही अनेक शिक्षकांनी ते काम नाकारल्याची चर्चा आहे. त्याचवेळी ते राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवारांच्या प्रचारात मात्र हिरीरीने सहभागी असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.राजकीय नेत्यांच्या दबावतंत्रामुळे त्यांच्या ड्युटीपुढे शाळा झुकल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या बदल्यात त्यांना तेथील प्रभावशाली उमेदवारांची ड्युटी करावी लागते आहे. सरकारी ड्युटी केली, तर त्या बदल्यात मानधन मिळते. पण उमेदवाराच्या ड्युटीच्या बदल्यात काहीही मिळत नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.निवडणुकीसाठी महसूलकडे मनुष्यबळ पुरेसे नसल्याने त्यांनी पंचायत समिती, कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, सर्व खाजगी शाळा, कॉलेजातील कर्मचारी यांना ड्युट्या लावल्या आहेत. तशी पत्रे त्यांच्या व्यवस्थापनाला पाठवली आहेत. यातील काही शिक्षकांनी बढती-बदलीची कामे लक्षात गेऊन उमेदवारांच्या प्रचारात उघडउघड सहभाग घेतला आहे, तर काहींनी शाळेत वशिला लावून ही कामे नाकारली आहेत. काही शिक्षकांसाठी उमेदवारांनी शाळेवर दबाव टाकून त्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. असे असेल तरी हे शिक्षक त्या त्या भागातील उमेदवारांचा, पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत.भाजपा उमेदवाराची हरकत फेटाळलीमुरबाड : ठाणे जिल्हा परिषद आणि मुरबाड पंचायत समिती निवडणुकीत मुरबाड तालुक्यात एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झाला नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी प्रसाद उकीर्डे यांनी सांगितले. सरळगाव पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जाला घेतलेली हरकत निवडणूक अधिकाºयांनी फेटाळली. जे दोन अर्ज बाद झाले त्या उमेदवारांचे दुहेरी अर्ज असल्याने तेही निवडणूक रिंगणात आहेत.एकाच कुटुंबातील तीन उमेदवारभिवंडी : खोणी, गणेशपुरी, कांबे या गटात आणि खोणी १, खोणी २, खोणी ३, कांबे व गोवे या गणात भाजपाने उमेदवार दिलेला नाही, असे बुधवारी स्पष्ट झाले. अंबाडीत मनसेचे विकास जाधव, शिवसेनेचे किशोर जाधव व भाजपाचे कैलास जाधव यांच्यात लढत होणार आहे. हे तिन्ही उमेदवार एकाच कुटुंबातील असून झिडके येथील रहाणारे आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यावेळी दाभाड गटातून निवडणूक लढवित आहेत.भिवंडीत काँगेसमध्ये गटबाजीपडघा : काँग्रेसचे भिवंडी तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांनी बोरिवली गटातील आपले तिकीट जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी कापल्याचा आरोप केल्याने पाटील आणि टावरे समर्थक समोरासमोर आले आहे. बोरिवली, खोणी व काटई भाग मुस्लिमबहुल आहे.भिवंडी तालुक्यात महायुती करून जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. पण जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांच्या चुकीच्या रणनीतीमुळे काँग्रेसचे नुकसान होणार आहे.उमेदवारी देताना हेतुपुरस्स्र माझ्या समर्थकांचे तिकीट कापल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी ग्रामीण तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांनी केला. त्याचा उत्तर देताना जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी काँग्रेसमध्ये पार्लमेंटरी कमिटी उमेदवारीचा निर्णय घेते. कमिटीने योग्य उमेदवार निवडल्याचा दावा केला.सेना- भाजपा- पुन्हा सेना : पडघा : भिवंडी तालुक्यातील भोईरपाडा येथील शिवसेनेचे माजी सरपंच दिगंबर भोईर यांनी भिवंडीचे खासदार कपील पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पण काही काळातच ते पुन्हा शिवसेनेत परतले. मी खासदारांना भेटायला गेलो असता त्यांनी भाजपचा पट्टा बळजबरीने गळ््यात घातल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात खासदारांशी संपर्क झाला नाही, पण भाजपा पदाधिकाºयांनी मात्र भोईर यांनी आपल्या मर्जीनेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला. पण शिवसेनेच्या दबावामुळे ते पुन्हा शिवसेनेत गेल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.
कामाला नकार, प्रचाराला होकार, शिक्षकांची स्थिती, निवडणूक कामात राजकीय दबावतंत्राचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:53 AM