शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

ठाण्यात स्वाइनचे रुग्ण घटले, पण जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीचा अजून पत्ताच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 10:21 PM

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही आतापर्यत 50 च्या घरात गेली आहे.

ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही आतापर्यत 50 च्या घरात गेली आहे. आता स्वाइनच्या रुग्णांमध्ये प्रचंड घट होताना अजून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या लसीचा पत्ताच नाही. परंतु त्याची ऑर्डर दिली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ठामपा आरोग्य विभागाने लस उपलब्ध असल्याचा दावा केला.ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा असून त्यामध्ये सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच दोन नगरपंचायतींचा समावेश आहे. 1 जानेवारी ते 4 ऑक्टोबरदरम्यान आतापर्यत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे 978 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील अजून 101 रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. जिल्ह्यात 46 आणि जिल्ह्याबाहेर तिघे असे 49 जण दगावले आहेत. त्यात सर्वाधिक 31 रुग्ण ठामपाच्या कार्यक्षेत्रात दगावले आहेत.जुलै महिन्यात जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्ह्यातील आरोग्य विभागाची बैठक बोलवली. तेव्हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना जनजागृती आणि लसखरेदी करण्याचे आदेश दिले. मार्च ते जुलैदरम्यान जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण 38 जणांचा बळी गेला होता. त्यापैकी जुलै महिन्यात 21 जण स्वाइनने दगावले. ऑगस्टमध्ये स्वाइनचा प्रादुर्भाव कायम होता. सप्टेंबर महिन्यात फ्लूसंबंधित लक्षणे दिसणा-या जिल्ह्यातील 17 हजार 56 जणांनी स्क्रिनिंग करून घेतले होते. त्यामध्ये 26 जणांना फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. त्यातच या महिन्यात केडीएमसी कार्यक्षेत्रात एक महिलेचा स्वाइनने मृत्यू झाला असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात स्वाइन फ्लू झपाटय़ाने वाढला, तितकाच तो झपाटय़ाने कमी होत आहे. त्यातच, ऑक्टोबर महिना उजाडला तरी, जिल्ह्याचे रुग्णालय असलेल्या ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूची लस अद्यापही आलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.याबाबत दुजोरा देऊन लसीची ऑर्डर दिली आहे. ती लवकरच उपलब्ध होईल. - डॉ. बी.सी. केम्पीपाटील, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकही साथ कमी झाली असली, तरी ठामपाने ही लस खरेदी केली आहे. त्यामुळे 1 हजार 500 लस उपलब्ध असून त्यांना गरज असेल, त्यांनाच दिली जाणार आहे. - डॉ. आर.टी. केंद्रे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा