शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

अभियंत्याच्या बदलीवरून वाद

By admin | Published: June 01, 2017 5:13 AM

केडीएमसीच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयातील बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता देविदास जाधव

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयातील बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता देविदास जाधव यांची कोणतेही ठोस कारण न देता नगररचना विभागात करण्यात आलेल्या बदलीला शिवसेनेच्या नगरसेविका नीलिमा पाटील यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे ही बदली वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी स्वत:च्या बदलीचे आदेश आल्यानंतर जाधव यांची बदली केली. त्यावर, पाटील यांनी घेतलेल्या हरकतीमुळे माजी आयुक्तांची कृती संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.नगररचना विभागात कार्यरत असताना जाधव यांनी चुकीचे प्रस्ताव सादर केले, अशी तक्रारही त्या वेळी नगरसेविका पाटील यांनी केली होती. त्याआधारे जाधव यांची बदली ई प्रभाग क्षेत्रातील बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागात करण्यात आली होती. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटत नाही, तोच त्यांची पुन्हा तेथून बदली करून त्यांची वर्णी नगररचना विभागात लावण्यात आली आहे. चार महिन्यांत असे काय घडले की, त्यांची बदली पुन्हा नगररचना विभागात करण्यात आली? जाधव यांच्या व्यतिरिक्त महापालिकेकडे अन्य कोणी कनिष्ठ अभियंता नाहीत का? आयुक्तांची बदली झाल्यानंतरही जाधव यांच्या बदलीबाबत इतकी तत्परता का, असे सवाल पाटील यांनी उपस्थित केले आहेत. माजी आयुक्त रवींद्रन यांची १८ मे ला नवी मुंबई येथे बदली झाली. मात्र, त्यांनी २५ मे ला पदभार नवीन आयुक्त पी. वेलरासू यांना सोपवला. दरम्यानच्या काळात १९ मे ला त्यांनी जाधव यांच्या बदलीला मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून २३ मे ला काढण्यात आला आहे. एकीकडे ई प्रभागांतर्गत बेकायदा बांधकामांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना तेथून जाधव यांची कोणतेही ठोस कारण न देता नगररचना विभागात केलेली बदली वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील महासभेत याबाबत आपण आवाज उठवणार असल्याचे नगरसेविका पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंत्रालयातून दबाव आल्याची चर्चाजाधव यांच्या बदलीसाठी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा दबाव माजी आयुक्तांवर होता, अशीही चर्चा आहे. यासंदर्भात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधला असता तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेने ही बदली केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.