शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

वीज खंडित, प्राथमिक आरोग्य केंद्रे अंधारात

By admin | Published: March 06, 2016 1:40 AM

या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे.

हुसेन मेमन,  जव्हारया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे. जव्हार तालुक्यात साकुर, साखरशेत, जामसर, नांदगाव, या चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या चारही आरोग्य केंद्रांचे वीजबील गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून थकले आहे. महावितरणने प्राथमिक आरोग्य केंद्राना गेल्या महिन्यांपासून वारंवार सूचना लेखी निवेदने देऊनही ते भरण्यात न आल्याने ही कारवाई महावितरणने केली. त्यामुळे ही केंद्रे फक्त दिवसाच रुग्णसेवा देऊ शकत आहेत.अगदी तातडीच्या परिस्थितीत मेणबत्ती अथवा चिमणीच्या प्रकाशात किंवा इमर्जन्सी व लॅम्पच्या प्रकाशात कसेबसे उपचार केले जातात. या केंद्रात रात्री-बेरात्री उपचारासाठी रोज शेकडो रुग्ण येतात. मात्र दोन दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने रुग्णांवर अंधारात उपचार केले जात आहेत. या केंद्रांचे ७ ते ८ महिन्यांपासून ३ लाख ५० हजाराचे लाईट बिल थकलेले आहे. आरोग्य केंद्रांना विद्युत लाईट नसल्याने, शीतगृहात व फ्रीजमध्ये टी.टी.चे इंजेक्शन, पोलिओ, लस, रक्त पिशवी, औषधे, इंजेक्शन फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. परंतु आता फ्रीजही बंद आहे. प्रशासनाने विजेची बिले भरून या आरोग्य केंद्राचा पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य- रतन बुधर, व जव्हार पंचायत समिती सदस्य- सुधाकर वळे, व मनोज गावंढा यांनी केली आहे. अन्याथा जव्हार एमएसीबीवर आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)पावसामुळे झाडे उन्मळलीजव्हार : या शहरात गुरूवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपले, मुकणे आळीतील सदू मुकणे व अरूण सहाने याच्या दुकानावर व परिसरातील मोटरसायकलींवर भले मोठे आंब्याचे झाड उन्मळून पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरात काही ठिकाणी मोठ मोठी झाडे पडली. परंतु आसपास घरे अगर इतर कोणीही नसल्यामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही. जव्हार नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख अखलाक कोतवाल आणि त्यांचे सहकारी यांनी तातडीने मनुष्यबळ वापरून झाडांच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला आहे. जव्हार मधील जुनी डॅम आळी येथील रहिवाशांच्या काही घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे, तर काही तुंबलेल्या गटारीत आलेले पावसाचे पाणी नासीर मेमन यांच्या घरात घुसून सर्वत्र दुर्गधी पसरली होती, त्यामुळे काही घरातील मंडळींना घर धुवून काढावे लागले, तसेच जव्हार तालुक्यातील खेडोपाड्यातही काजू व आंब्यांच्या बागांचे मोहोर गळल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेले आहे, गेल्या दोन तीन वर्षापासून फेब्रुवारी व मार्र्च महिन्यात अचानक अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात आंबा व काजूची आवक कमी होत चालली आहे, मेहनत करून फळ मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे नुकासान सहन करण्याखेरीज दुसरे काहीच करता येत नाही, आणि शासनाच्या तटपुंज्या भरपाईमुळे झालेले नुकसान भरून निघत नाही असे शेतकऱ्यांनी बोलतांना सांगितले. (वार्ताहर)