उल्हासनगर: अमृतवेलाचे गुरूप्रित सिंग उर्फ रिंकू भाई यांनी २२ डिसेंबर रोजी सत्संग करतेवेळी सिंधी समाजाच्या भावना दुःखावणारी टीका-टिप्पणी केली. याचे पडसाद राज्यासह शहरात उमटले असून विविध सिंधी संघटनांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान रिंकू भाई साहेब यांनी याबाबत सोशल मीडियावर भावना दुखल्या बाबत माफीही मागितली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथे प्रसिद्ध अमृतवेला सत्संगचे प्रमुख रिंकू भाई साहेब यांचे चॅनेल मार्फत सत्संग होत असून लाखो नागरिक त्यांचे फॉलोअर्स आहेत. २२ डिसेंबर रोजी संत्संगमध्ये त्यांनी सिंधी समाजाच्या पूजा पद्धतीवर टीका टिप्पणी केल्याचा आरोप सिंधी समाजाने केला आहे. यामुळे दुखवलेल्या गेलेल्या सिंधी समाजात रिंकू भाई साहेब यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. गुरवारी भारतीय सिंधी सभेचे पदाधिकारी व भाजप नगरसेवक महेश सुखरामनी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन रिंकू भाई साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी दिपक वाटवानी, सरिता खानचंदानी यांच्यासह अनेक पदाधिकारी होते. शुक्रवारी रवी वलेच्चा, प्रवीण कारिरा, जॅकी गंगारामानी, करण दराडे यांनीही पोलीस उपायुक्तांना गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले.