ठाणे : महापालिकेत अवघ्या तीन नगरसेवकांचे पाठबळ असलेल्या कॉंग्रेसची अवस्था सध्या ठाण्यात फारशी चांगली नाही. पक्षातील पदाधिका:यांमध्येच गटबाजी आहे. अशी परिस्थिती असातांना इतर पक्षातील 25 विद्यमान नगरसेवक माङया संपर्कात असल्याचा दावा कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमधून इतर पक्षात गेलेल्या माजी महापौर नईम खान यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी शनिवारी चव्हाण यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. ठाण्यातील राजकीय क्षेत्रतील विविध पक्षातील पक्षप्रवेश चालु आहेत. शनिवारी मुळचे काँग्रेसचेच पण काहीसे काँग्रेसकडून दुर झालेले कळवा-मुंब्रा परिसरातील माजी महापौर नईम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले वसीम सय्यद व राजकीय विश्लेषक मो. अब्दुल्ला यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान यावेळी बोलतांना चव्हाण यांनी सांगितले की,येत्या काही दिवसांतच ठाण्यातील दिग्गज असे विविध पक्षातील पदाधिकारी/नगरसेवक हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतील असे भाकित केले आहे. विशेष म्हणजे असे दिग्गज नगरसेवक कॉंग्रेसमध्ये आले तर आगामी ठाणो महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच जागावर आम्ही तयारी करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु हा दावा करीत असतांनाच पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यांनतर नक्की काय ते सांगू अशी सावध भुमिकाही ते घेण्यास विसरले नाहीत. एकीकडे ठाणो शहर कॉंग्रेसच ही तीन नगरसेवकांची आहे. त्यातही या तीघांमध्येही एकमत नाही, मुंब्य्रातील एक नगरसेवक तर शिवसेनेबरोबर यापूर्वीच हातमिळवणी करुन मोकळा झाला आहे. त्यावरुन आजही शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात वादंग होतांना दिसत आहे. तसेच पक्षातील इतर पदाधिका:यांमध्येही एकमत नसल्याने गटातटाचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चव्हाण यांनी आता जो दावा केला होता, तो कितपत खरा ठरणारे हे आता येणारा काळच निश्चित करणार आहे.
दरम्यान नईम खान यांनी बोलताना सांगितले की,ठाणे काँग्रेसला विक्रांत चव्हाण यांच्या रूपात सक्षम नेतृत्व मिळाले असून त्यांच्या काम करण्याची पद्धतीमूळे आगामी काळात ठाण्यातील काँग्रेस अधिकाधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.