भिवंडी : भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेच्या ‘तेजोमय दिवस’ या मासिकपाळीसंदर्भातील जनजागृतीपर चित्रफितीला दिल्ली शिक्षक संशोधन परिषदेची पसंती मिळाली आहे. चित्रफितीतील नाटिकेचे सादरीकरण करण्यासाठी या शाळेतील विद्यार्थी केरळला होणाऱ्या दिल्ली शिक्षक संशोधन परिषदेसाठी शुक्र वारी रवाना झाले. राहनाळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच या नाटिकेचे दिग्दर्शक अजय पाटील यांनी यासंदर्भात समाधान व्यक्त केले आहे.‘तेजोमय दिवस’ हा लघुपट आणि ‘रामाचा मामा शेतावर गेला’ हे बडबडगीत शिक्षक संशोधन परिषद येथील आॅल इंडिया आॅडिओ व्हिडीओ फेस्टिव्हलसाठी निवडले गेले होते. हे दोन्ही कार्यक्र म केरळ येथे होणाºया कार्यक्र मात सादर होणार आहेत. ‘तेजोमय दिवस’ हा लघुपट १० ते १४ वयोगटांतील मुलींना जेव्हा मासिकपाळी येते, तेव्हा काय परिस्थिती असते, यावर आधारित आहे. विद्यार्थिनींनी घाबरून न जाता आपले पालक, शिक्षिका यांची मदत घेतली पाहिजे, असा संदेश दिला आहे. लघुपटाची निर्मिती लक्ष्मी चित्रच्या बॅनरखाली केली आहे.शिक्षक, विद्यार्थ्यांचे केले कौतुकदोन्ही कार्यक्र मांची निवड झाल्याबद्दल राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी, उपसरपंच प्रदीप पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सपना भोईर, पंचायत समितीच्या सदस्या ललिता पाटील, बीट विस्तार अधिकारी संजय असावले, केंद्रप्रमुख जयश्री सोरटे, मुख्याध्यापक सुरेश साळुंखे आणि महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.या लघुपटाला निखिल घिगेयांनी संगीत दिले आहे. तर, कॅमेरा उन्नी नायर, कलादिग्दर्शन महेंद्र अढांगळे आणि लेखन, दिग्दर्शन राहनाळ शाळेचे शिक्षक अजय पाटील यांनी केले आहे. ‘रामाचा मामा शेतावर गेला’ हे बडबडगीत परिषदेसाठी निवडले. मानसी टोळे, आरती ढवले, यश पाटील, प्रतीक्षा गायकवाड, अभय सरोज, अंकिता आंबेकर यांनी गायले आहे.
जि. प. शाळेच्या ‘तेजोमय दिवस’ चित्रफितीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:19 PM