ठाणे - जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात एक हजार ७८८ रास्त भाव शिधावाटप दुकाने सुरू आहेत. या दुकानांतून शिधापत्रिकाधारक व गरज कुटुंबीयांना रास्त भावात अन्नधान्याचे वाटप सुरू आहे. यामुळे दरमहा शेकडो मेट्रिक टन अन्नधान्य वितरित केले जात आहे.
१) जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने -
* शहरी भाग - ११९५
* ग्रामीण भाग - ५९३
२) कोणत्या तालुक्यात किती वाढणार?
अ. शहापूर- २
ब. मुरबाड- १
३) लाभार्थ्यांची गैरसोय दूर होणार-
जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी रेशनिंग दुकाने सुरू केलेले आहेत. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण अशा दोन प्रशासकीय यंत्रणांकडून शिधावाटप विभागाचे काम सुरू आहे. यामुळे रेशनिंगच्या अन्नधान्याची सेवा कार्डधारकांना सुरळीत मिळत आहे. आता ही बंद दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याने त्या परिसरातील कार्डधारकांना या सेवेचा सहज लाभ होईल.
४) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा कोट
जिल्ह्यातील शिधावाटप दुकाने लोकसंख्येस अनुसरून ठिकठिकाणी सुरू केली आहेत. लाभार्थी कार्ड संख्येस अनुसरून सेवा दिली जात आहे. पण, दरम्यान काही दुकाने बंद झाली होती. ती शासन आदेशानुसार आता पुन्हा सुरू होतील. नवीन दुकानांना मात्र मंजुरी मिळणार नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तीन जुन्या बंद दुकानांचे प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.
- राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे