ठाणे : कोरोना व्हायरसच्या पाशर््ववभूमीवर सध्या अनेक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर आदींसह इतर महत्वाच्या साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अत्यावश्यक देणाºया खाजगी डॉक्टरांनाही या साहित्याचा तुटवडा दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडीकल असोसिशनच्या ठाणे टिमच्या वतीने ठाण्यातील तब्बल १५० डॉक्टरांना मास्क, सॅनिटायझर आणि इतर साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. ठाण्यातील एका हॉलमध्ये या साहित्याचे वाटप करतांना सोशल डिस्टेटींगचेही पालन करण्यात आल्याचे दिसून आले. शहरात सध्या विविध वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. मेडीकल मध्ये मास्क आणि सॅनिटायझरचाही तुटवडा दिसून येत आहे. विशेष म्हणजे खाजगी सेवा देणाºया डॉक्टरांना देखील एन ९५ मास्क आणि इतर साहित्य नसल्याने रुग्णांवर उपचार करतांना अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे गुरुवारी ठाण्यात एका वैद्यकीय सेवा देणाºयालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र अशातही सेवा देणे हे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या वतीने गुरुवारी सांयकाळी त्यांच्या शाखेच्या हॉलमध्ये शहरातील १५० डॉक्टरांसाठी एन ९५ मास्क, साधे मास्क, गॉगल्स, ग्लोज आणि सॅनिटायझरचे वापट केले. यावेळी सोशल डिस्टेसिंगचे पालनह करण्यात आल्याचे दिसून आले. नागरीकांना सेवा देतांना डॉक्टरांसाठी ही साधने महत्वाची मानली जात होती. त्यामुळे त्यांनी आपली स्वत:ची काळजी घ्यावी या उद्देशाने या साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती डॉ. संतोष कदम यांनी दिली.
अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या खाजगी डॉक्टरांना मास्क आणि इतर साहित्याचे वाटप इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे टीमचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 3:04 PM