शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

ठाणे जिल्ह्यातील पूरग्रस्त, दरडप्रवण गावांना स्ट्रेचर, लाईफ जॅकेटचे वाटप!

By सुरेश लोखंडे | Published: June 07, 2024 3:41 PM

स्थानिक प्रशासनामार्फत या साहित्याचे वाटप करण्यात आले, असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.

ठाणे : आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी जिल्ह्यातील पूर व दरडप्रवण गावांना फोल्डिंग स्ट्रेचर, बहुद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझाटर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्याचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडूनकरण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनामार्फत या साहित्याचे वाटप करण्यात आले, असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना आहे. अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने मदत पोहचविणे व संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता आहे. या साहित्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून साहित्याचे स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करण्यात आले. त्यांच्याकडून हे साहित्य दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना दिले जाणार आहे.

जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या आवश्यक साहित्यांमध्ये फोल्डिंग मल्टिपर्पज स्ट्रेचरचे एक हजार ७०५ संच आहेत. फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर व इतर साहित्याचे ७१० संच आहेत. आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य व रेस्क्यू किटचे ५५० संच, बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅगचे एक हजार २६०संच, नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेटचे एक हजार १९० संच आदी साहित्याचे वाटप आज करण्यात आले आहे.

साहित्याचे वाटप यांना झाले -ठाणे महानगरपालिकेसह नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर आदी महापालिकांना आणि अंबरनाथ व कुळगांव बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी ६० बहुद्देशीय माेठे स्ट्रेचर देण्यात आहे. तर २५ मध्यम आकाराचे स्ट्रेचर, ४० फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, २५ डिझास्टर मॅनेजमेंट किट, ६० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, ५० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे), १० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट,५० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालये व मीरा भाईंदर अपर तहसील कार्यालयांना प्रत्येकी १०० बहुद्देशीय स्ट्रेचर –(मोठे), ४० मध्यम आकाराचे स्ट्रेचर, ५० फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, ५० डिझास्टर मॅनेजमेंट किट, १०० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, १०० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि १० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, ५० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत.

हा आहे उपयोग -एखादी व्यक्ती उंच इमारतीवर अथवा आगीत अडकली तर त्या व्यक्तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे स्ट्रेचर उपयुक्त ठरणार आहे. तसेच हे स्ट्रेचर पाण्यावर तरंगणारे असल्यामुळे पूर परिस्थितीत त्याचा उपयोग होणार आहे. रेस्क्यू रोपद्वारे इमारतीमधून अथवा अडचणीच्या जागेतून,दऱ्या खोऱ्यातून सुखरुपणे काढण्यासाठी उपयोग होणार आहे.

फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर (संसर्ग रोधक) सोबतच्या किटमध्ये अंबू बॅग, कार्बन मास्क, हँड ग्लोज, सॅनिटायझर, शिट्टी, प्रेशर बॅंडेज,सेनेटरी पॅडस कॉडियेट पाईप, नेक बेल्ट, रेस्क्यू रोप, लिक प्रूफ लगेज बॅग, ऑईनमेंट, कापूस आदी साहित्याचा समावेश आहे.

रेस्क्यू किटमध्ये अनेक छोट्या मोठ्या जीवनरक्षक सुरक्षित नावीन्यपूर्ण साधनांचा समावेश आहे. त्यामुळे हा संच शोध व बचाव पथक पोहचण्यापूर्वी उपयोगात येणार आहे. या संचामध्ये कार्बन मास्क, हँड ग्लोज, कॉम्पॅक्ट स्ट्रेचर, रिचार्जेबल रेस्क्यू टॉर्च, नेक बेल्ट, शिट्टी, रोलर बँडेज, लाल रंगाचे त्रिकोणी तसेच मेडिकेटेड बँडेज, सक्शन पंप, जखम साफ करण्यासाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध, रेस्क्यू रोप, टूल किट, टूल किट, सीपीआर मास्क सर्च लॅम्प आदी सुमारे 34 उपयुक्त साहित्यांचा समावेश आहे.

साहित्य वापराचे प्रशिक्षण -आपत्त्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पूरग्रस्त व दरडप्रवण गावांना दिलेल्या साहित्य कसे वापरावे, त्याची देखभाल कशी करावी याचे प्रशिक्षणही संबंधित गावातील कर्मचारी, आपदामित्र व हे साहित्य वापरणारे कर्मचारी यांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस