शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

जिल्ह्यात ३,४९४ बालकांनी आरटीई प्रवेश नाकारले, शिक्षण विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 9:52 AM

यंदा ६६९ शाळांमध्ये ‘आरटीई’खाली प्रवेश दिले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर प्रतीक्षायादीतील १,८९४ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारांतील बालकांना त्यांच्या जवळच्या शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ९,३२६ मुलांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली. यापैकी ५,६७७ जणांचे प्रवेश झाले असून १५२ जणांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. उर्वरित ३,४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील शाळेत गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.

यंदा ६६९ शाळांमध्ये ‘आरटीई’खाली प्रवेश दिले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर प्रतीक्षायादीतील १,८९४ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील १३४ जणांनीच प्रवेश घेतले आहेत. तर, १,७५८ बालकांचे पालक प्रवेशासाठी शाळेत गेलेले नाहीत. उर्वरित बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण, लाॅकडाऊनमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी त्यांच्या परिने या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, अनेक पालकांना विविध समस्या, शाळांकडून मार्गदर्शन न झाल्यामुळे मुलांचे प्रवेश घेता आलेले नाहीत. 

आजपर्यंत १३४ जणांना प्रवेश मिळाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या १,७९२ मुलांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रवेश रखडले आहेत. यासाठी जूनमध्ये सोडतीद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.

तक्रार क्रमांक 1-प्रवेश नाकारलेल्या बालकांच्या पालकांकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे काही बालकांचे प्रवेश नाकारले आहेत.

तक्रार क्रमांक 2 -जातीचा दाखला नसल्यामुळेही प्रवेश नाकारले. परराज्यांतील जातीचे दाखले असल्याच्या कारणाखालीही प्रवेश दिला नाही.

२३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घ्या -प्रतीक्षायादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश २३ तारखेपर्यंत दिलेल्या शाळेत पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्ससह अलॉटमेंट लेटरची प्रत सोबत न्यावी. पालकांनी मुलांना शाळेत घेऊन जाऊ नये.             - समिना शेख, शिक्षणाधिकारी (प्र.), जि.प. ठाणे 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीthaneठाणे