ठाणे : गेल्या तीन-चार दिवसांपासून पाचशेच्या खाली गेलेली ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या बुधवारी पुन्हा ५०३ वर गेली. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २६ हजार ४७६ रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३९० झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ११७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख ३१ हजार ९६४ झाली आहे. शहरात पाच मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या एक हजार ९५५ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत १३३ रुग्णांची वाढ झाली असून, तिघाजणांच्या मृत्यूची नोंद झाली. नवी मुंबईत ७४ रुग्णांची वाढ झाली असून, सहाजण दगावले. उल्हासनगरमध्ये आठ रुग्णांसह एका मृत्यूची नोंद झाली. भिवंडीत सात बाधित वाढले असून, मृत्यूची नोंद नाही. मीरा-भाईंदरमध्ये ६५ रुग्ण आढळले असून, दोघांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ११ रुग्ण आढळले असून, तीन मृत्यूंची नोंद आहे. बदलापूरमध्ये २४ रुग्णांची नोंद असून, १७ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ६४ नवे रुग्ण वाढले आहेत. आता बाधित रुग्णसंख्या ३८ हजार ५२६ झाली असून, आतापर्यंत एक हजार १४० मृत्यूंची नोंद झाली आहे.