ठाणे - कासारवडवली, कळवा पोलीस ठाणे उभारण्यात ठाणे महापालिकेने यापूर्वी महात्वाची भुमिका बजावली होती. त्यानंतर आता कल्याण फाटा येथील जकात नाक्याची इमारत शिळ डायघर पोलीस ठाण्याकरीता देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून भाडेतत्वावर ही जागा दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. शिळ डायघर पोलीस ठाण्याची इमारत रस्ता रुंदीकरणात बाधीत होणार आहे. त्यामुळे हे पोलीस ठाणे दुसरीकडे स्थलांतरीत करणे आवश्यक ठरले आहे. ठाणे पोलिसांनी महापालिकेच्या जकात नाक्याची जागा पोलीस ठाण्याकरीता ताब्यात मिळावी अशी मागणी केली आहे. या बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ हे ३९४.४७ चौ.मी. एवढे आहे. त्यानुसार मासिक भाडे हे ८६ हजार २४१ अधिक जीएसटी असे आकारले जाणार आहे. त्यानुसार ही वास्तु पुढील पाच वर्षाकरीता पोलीस ठाण्याला भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. या वास्तुमध्ये कोणत्याही स्वरुपाचा फेरफार करता येणार नाही, वीज व पाणी यांचे संयोजन स्वंतत्र घ्यावे लागणार आहे. करारनाम्यातील अटी आणि शर्तींचा भंग केल्यास भाड्याने दिलेली जागा खाली करुन घेण्यात येणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
कल्याण फाटा येथील जकात नाक्याची जागा शीळ डायघर पोलीस ठाण्याला मिळणार - पालिका करणार भाडेकरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 2:49 PM
ठाणे महापालिका आता शीळ डायघर पोलीस ठाण्याकरीता जकात नाक्याची जागा भाडेतत्वावर देणार आहे. यासाठी ८६ हजार २४१ रुपयांचे मासिक भाडे आकारले जाणार आहे.
ठळक मुद्देकळवा, कासारवडवली पाठोपाठ महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णयप्रस्ताव महासभेच्या पटलावर