ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील पाच जुन्या इमारती पाडण्यास शासनाने मार्च महिन्यात अध्यादेश काढून मंजुरी दिल्यानंतर आता त्यात आणखी ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यास १७ जुलै रोजी हिरवा कंदील दिला आहे. या वाढीव बेडमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय ५७४ बेडचे होणार आहे. तसेच ते सुरू करण्यासाठी इमारतींचे अंदाजपत्रक आणि आराखडे तयार करण्याची कार्यवाही क रण्याचे आदेशही दिले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयाला ३३६ बेडची मान्यता दिली होती. त्यानंतर, विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी पाच वॉर्ड नव्याने सुरू करताना त्यावेळी ३१ बेडची वाढ के ल्याने सध्या त्यात ३६७ बेड कार्यान्वित आहेत.>स्थलांतराचाप्रश्न ऐरणीवर?एकीकडे शासनाने कै.श्री. विठ्ठल सायन्ना यांनी १९३६ साली ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे दानस्वरूपात बांधून दिले. त्या ब्रिटिशकालीन इमारतीत कार्यरत असून रुग्णालयाच्या काही इमारती सध्या अतिशय जीर्ण आणि वापरण्यास अयोग्य झाल्या आहेत. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ते नावारूपास आले आहे. त्याच्या आवारातील ए, बी, सी,डी आणि ई या पाच जुन्या झालेल्या इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला ९ मार्च २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. त्यावेळी राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाच्या इमारतीत त्याचे स्थलांतरण करताना केंद्र शासनाकडून याबाबतची परवानगी मिळाल्यानंतरच ते करावे, असे म्हटले आहे. मात्र, त्याला मंजुरी मिळालेली नाही.>रुग्णालयाच्या बेडमध्ये ६७ ने होणार वाढशासनाने नव्याने मेडिकल वॉर्ड-६ बेड, लेबर वॉर्ड-३४, ट्रामा केअर युनिट-५, इन्सेटिव्ह केअर युनिट-१२, आयसोलेशन वॉर्ड-३, सायकियाट्रिक वॉर्ड-२, प्रिसोनेर वॉर्ड-३ आणि हेमाटॉलॉजी-२ असे एकूण ६७ बेडला मंजुरी दिली आहे.>सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे १४० बेडसुपर स्पेशालिटी रुग्णालयात चार विभाग सुरू होणार आहेत. त्यामध्ये कार्डिओलॉजी अॅण्ड कार्डियो वस्क्युलर सेक्शनमध्ये आयसीसीयू विभाग-१० बेड, आयसीसीयू (कॅथ लॅब)-१०, मेल वॉर्ड-१० आणि फिमेल वॉर्ड-१० तसेच न्यूरोलॉजी अॅण्ड न्यूरो सर्जरी आणि आॅन्कोलॉजी अॅण्ड ओंको सर्जरी सेक्शनमध्ये आयसीसीयू-१०, मेल वॉर्ड-१५ आणि फिमेल वॉर्ड-१५ असे प्रत्येकी बेड आहेत. त्याचबरोबर नेफ्रोलॉजी अॅण्ड डायलिसिस सेक्शनमध्ये नेफ्रोलॉजी वॉर्डमध्ये १० आणि डायलिसिस वॉर्डसाठी १० बेडचा समावेश आहे.
स्पेशालिटीसह ५७४ बेडचे होणार जिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:04 AM