ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज केवळ एकच शिक्षणाधिका-याव्दारे सुरू आहे. मात्र त्यांच्यावर मनमानी व उद्धट वागणूकीचा आरोप करीत ‘शिक्षणाधिकारी मीना यादव हटवा व जिल्हा वाचवा’ आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील त्रस्त मुख्याध्यापक व शिक्षकांनी ठाणे जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी आक्रोश मोर्चा काढला. या दरम्यान बाजारपेठेतील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला.
येथील कन्या शाळेच्या मैदानावर एकत्र आलेले शाळांचे संस्थापक, संचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांना शिक्षणाधिकारी हटवाच्या मागणीसह शासनाच्या जटील निर्णायातील सुधारणेसाठी निवेदन दिले. यानंतर हा मोर्चा बाजारपेठेतून कोर्ट नाका येथे धडकला. येथे सभेत रूपांतर झालेल्या या मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिक्षक सेना प्रांत अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक व शिक्षक व संस्थापकांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला.
या मोर्चात ठाणो जिल्हा संस्थाचालक संघटना, जिल्हा मुख्याध्यापक संघटनेसह प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सेना, कास्ट्राईप संघटना, जिल्हा कलाध्यापक शिक्षकेतर संघटना, क्रीडा शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक आदी संघटनांचे नेते कार्यकर्त शिक्षक सहभागी झाले. या मोर्चाव्दारे त्यांनी शिक्षणाधिका:यांची मनमानी उघड करून त्वरीत बदलीची मागणी लावून धरली.आरटीई पुनर्मान्यता, शालार्थ वेतन प्रणालीत २० शिक्षकांची नावे समाविष्ठ करणो, त्यांचे रखडलेले सहा महिन्याचे वेतन देणो, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणो, विद्यार्थ्यांचे नाव व जात बदल प्रस्ताव दीर्घकाळापासून प्रलंबित ठेवले ते निकाली काढणो,इंडेक्स देणो आदी जिल्हा परिषदेच्या पातळीवरील मागण्यांसह २० टक्के अनुदानीत झालेल्या शाळांना 1०० टक्के अनुदान देणो, जुनी पेन्शन योजना लागू करा, शाळांवरील अतिक्रमण थांबवा, इंग्रजी शाळांची मंजुरी बंद करा आदी शासनपातळीवर मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात महेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, संदिपान मस्तुद, चंद्रकांत पवार, प्रविण पाटील,चिंतामण वेखंडे,विष्णु विशे,राजेंद्र पालवे, भालेराव, तांबे,दिगंबर डोंगरे, प्रल्हाद कोलते,अस्लम शेख, नौशाद शेख, आदी विविध संघटनांच्या पदाधिका:यांनी या आक्रोश मोर्चात सहभाग घेतला.