ठाणे : केंद्र पुरस्कृत उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १७ मार्च राज्यासह ठाणे जिल्ह्यातील असाक्षरांची पायाभुत साक्षरता आणि मुल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातून २२ हजार ५७८ असाक्षर परीक्षार्थी आहेत. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या एक हजार ६२८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे, असे शिक्षणाधिकारी (याेजना) भावना राजनाेर यांनी लाेकमतला सांगितले.
जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले. शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या असाक्षरांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, जीवनकौशल्ये विकसित करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञानासह आर्थिक साक्षरता, कायदा आणि डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यनिहाय बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण अशा घटकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, गटस्तरीय, केंद्रस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या आहेत.
आज पार पडणारी पायाभूत चाचणी ही वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन भागांसाठी आहे. प्रत्येकी ५० या प्रमाणे १५० गुणांची ही ऑफलाईन होणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ३३ गुण आवश्यक आहेत, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित असणार आहे. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जास्त वेळ दिला जाणार आहे. परीक्षार्थी परीक्षेसाठी जाताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी सोबत न्यायचा आहे,