शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

जिल्ह्यात पाणीटंचाई वाढणार?

By admin | Published: December 09, 2015 12:46 AM

कल्याण-डोंंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरसह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणात २२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरसह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणात २२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. सध्या ३० टक्के कपात लागू केल्याने जून अखेरपर्यंत हे पाणी कसेबसे पुरेल, असा दावा लघू पाटबंधारे खात्याने केला असला, तरी मार्च ते जून या काळात पाणीटंचाई तीव्र होत जाईल, अशी चिन्हे आहेत.उन्हाळ््यातील भीषण पाणीटंचाईच्या काळातील व्यवस्थेबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाकडे अद्याप कोणतेही नियोजन नसल्याची वस्तुस्थिती अधिकाऱ्याशी केलेल्या चर्चेनंतर समोर आली. पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या घोषणा खुद्द मुख्यमंत्री सतत करत असले तरी त्यादृष्टीने कोणत्याही पथदर्शी प्रकल्पाची आखणी एकाही पालिकेने केलेली नाही. बारवी धरण औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचे आहे; तर भिवपुरी येथील आंध्र धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. या दोन्ही धरणातून उल्हास नदीत दररोज जवळपास एक हजार दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. उल्हास नदीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम पाणीपुरवठा योजना आणि कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलते. सध्या बारवी धरणात १३९.८६ घन दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे; तर आंध्र धरणात ११४.५९ घन दक्षलक्ष लिटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे या दोन्ही धरणाचे पाणी २२० दिवस पुरेल.आंध्रातील पाण्यापासून टाटा पॉवर कंपनी वीजनिर्मिती करते. त्यामुळे येथून दररोज चारशे ते पाचशे दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीत सोडले जाते. जोवर नदीच्या पाण्याचा प्रवास सुरळीत आणि पुरेसा असतो. तसेच पाण्याची पातळी खालावलेली नसते, तोवर बारवीतून पाणी सोडत नाहीत. या वर्षी १५ आॅक्टोबरपासूनच पाणी सोडावे लागले.> एमआयडीसीने उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. हा पुरवठा बुधवार ९ डिसेंबरला रात्री १२ ते शुक्र वारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, मुंब्रा, दिवा, बाळकुम पाडा क्र .१, कोलशेत या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामधून रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, बॉम्बे कॉलनी हा भाग वगळण्यात आला आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. > कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत १५० कोटी रुपयांची पाणीयोजना सुरू केली. यापूर्वी पाण्यासाठी महापालिका औद्योगिक विकास महामंडळावर पूर्णपणे अवलंबून होती. महापालिका महामंडळाकडून जास्त दराने पाणी घेऊन नागरिकांना कमी दर आकारत होती. स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित झाल्यावर जलशुद्धीकरण पालिका करणार असल्याने खर्च वाचेल आणि नागरिकांना स्वस्त दरात पाणी मिळेल, असे सांगितले जात होते. योजना सुरू झाल्यावरही पाण्याचा दर हजार लिटरचा दर कायमच राहिला. तो कमी झाला नाही. मात्र गेल्या तीन वर्षात पाण्याचे दर वाढविले नसल्याने वेगळ््या शब्दांत पाणी स्वस्त असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. >