ठाणे : दिवा डम्पिंग ग्राउंडवरील आगीमुळे वाढलेल्या धुराने लहान मुलांना खोकल्याचे आजार वाढले आहेत. त्यातच उपमहापौर दिव्याचे रहिवासी असले तरी त्यांना याचे गांभिर्य नाही. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून दिवावासीयांना खरोखरच त्रास होतो का जाणीव महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना व्हावी, यासाठी त्यांनी फक्त दिव्यात तीन दिवस मुक्कामासाठी येण्याचे निमंत्रण स्थानिकांनी मंगळवारी दिले. ते आयुक्त स्वीकारणार का? याकडे आता दिव्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.कल्याण पाठोपाठ ठाण्यातील दिवा डम्पिंग ग्राउंडवरील कचºयाला आग लागून दिव्यात धुरच धुर पसरला आहे. अजूनही येथे आगीच्या घटनांचे सत्र सुरू असल्याने ही बाब चिंताजनक आहे. या धुरामुळे लहान मुलांना खोकल्याचे आजार वाढले आहेत. या वाढत्या आजाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आयुक्तांनी सोबत पालिकेतील महत्त्वाच्या अधिकाºयांना घेऊन यावे असे रोहिदास मुंडे यांनी या निमंत्रणात म्हटले आहे.>तीन दिवस पुरेसेराहण्याची व जेवणाची सोय दिवा डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला अलिशान तंबू बांधून करू, असे निमंत्रणात म्हटले आहे.आपण हुशार असल्याने तीन दिवस अभ्यासासाठी पुरेसे आहेत. यानिमित्ताने आपणांस दिवावासीयांचे प्रश्न समजतील, असे त्यात स्पष्ट केले आहे.
ठाण्याच्या आयुक्तांना दिवा डम्पिंगचे निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 3:53 AM