सुरुवातीला मालवाहतुकीसाठी सुरू झालेला दिवा-पनवेल मार्ग पुढे प्रवासी वाहतुकीसाठीही खुला झाला. पण पाच दशके उलटल्यानंतरही त्या प्रवासी वाहतुकीला गती मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याबद्दल ‘लोकमत’च्या वाचकांनी रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाला उपनगरी दर्जा दिल्याने लवकरात लवकर त्यावरून लोकल सुरू केल्यास या मार्गावरील औद्योगिक वसाहती, गृहनिर्माण वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.दिवा - पनवेलदरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण झाले. त्यावरून शटल सेवा सुरू झाली. पुढे या मार्गाला उपनगरी मार्गाचा दर्जा मिळाला. त्यामुळे या मार्गावरून लवकरच लोकल वाहतूक सुरू होईल, अशी येथील प्रवाशांची अपेक्षा होती. हा मार्ग रोह्यापर्यंत विस्तारित झाला. त्यातील पेणपर्यंतच्या मार्गावर ईएमयू सेवा सुरू झाली. याच मार्गावरील थळपर्यंतचा आरसीएफ खत कारखान्याचा मार्ग वापरून अलिबागपर्यंत लोकल सुरू करण्याचे स्वप्न दाखवले गेले. मात्र, दीर्घकाळ ही स्वप्नेच राहिली. हार्बर रेल्वेमार्गाचा मुंबई ते पनवेल असा विस्तार झाला. ठाणे ते पनवेल असा नवा मार्ग सुरू झाला. त्यातील उरणच्या मार्गाचे काम सुरू झाले. पनवेल-उरण हा स्वतंत्र मालवाहतुकीचा मार्ग पुनरुज्जीवित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दिव्याहून वसईला जाणारा मार्ग डहाणूपर्यंत विस्तारित करून डहाणू-पनवेल वाहतूक सुरू झाली. ती पेणपर्यंत वाढवण्याची मागणी सुरू आहे. पनवेल-कर्जत मार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या, त्यावरून मेल-एक्स्प्रेससह लोकल सुरू करण्याच्या मागणीला वेग आला. मात्र, या साऱ्या वाढत्या पसाºयात दातिवली, आगासन, निळजे, तळोजा, नावडे, कळंबोलीमार्गे पनवेलला जाणारा मूळचा मार्ग मध्य रेल्वेकडून दुर्लक्षितच राहिला. या मार्गावरून कोकण रेल्वेच्या गाड्या धावतात. शिवाय दिवसाकाठी प्रवासी वाहतुकीच्या साधारण सात फेºया होतात. पण त्यातील काही शटल सेवा, काही मेमू गाड्या असल्याने त्यांच्या फेºया, गतीवर मर्यादा येतात. त्यामुळे या मार्गावरून लोकल सुरू करण्याची मागणी वारंवार होत आहे.आगासन, निळजे, तळोजा येथील गृहनिर्माण प्रकल्प असोत की तळोजा, नावडे, कळंबोलीतील औद्योगिक वसाहती असोत, त्यांच्या विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. मध्यंतरी या मार्गावरील उसरघर येथे नवे स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या, पण त्याला विरोध झाला. दिव्याजवळ म्हातार्डी येथे थांबणाºया बुलेट ट्रेनचे स्टेशन या मार्गाजवळ असल्याने त्यानिमित्ताने तरी या मार्गावरून लोकल सुरू करण्याची मागणी नव्याने सुरू झाली आहे.सुरुवातीला अपुºया रेकचे (गाड्या) कारण पुढे करणाºया मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांत या मार्गाबद्दल मौन बाळगले आहे. या भागातील खासदारांनी पाठपुरावा केला, तर त्यासाठी रेल्वेवर दबाव येईल. त्यातून मेमू, शटलऐवजी या मार्गावरून लोकल धावू शकतील, अशी भावना ‘लोकमत’च्या वाचकांनी व्यक्त केली आहे.>खासदारांचे दुर्लक्षदिवा-पनवेल मार्गावरून लोकल सुरू व्हावी, यासाठी या भागातील रहिवासी गेली वीस वर्षे आग्रही आहेत, पण दुर्दैवाने एकाही खासदाराने आजवर या मार्गाचे महत्त्व समजून घेतले नाही. त्यामुळे त्यासाठी रेल्वेवर कधी दबाव आला नाही. तीन खासदारांच्या मतदारसंघातून हा मार्ग जात असल्याने कुणा एकावर जबाबदारी नव्हती. त्यामुळेही हा मार्ग सदैव उपेक्षित राहिला. - अर्जुन म्हात्रे, दिवा>महिला प्रवाशांचेहाल कमी होतीलदिवा-पनवेलदरम्यानचा लोहमार्ग तयार असूनही आगासन, निळजे, तळोजा, नावडे, कळंबोलीच्या प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे दिवा- पनवेल या मार्गावर लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाºया आमच्यासारख्या महिला प्रवाशांचे हाल कमी होतील.- सुचिता शिरसाट>...तर प्रवाशांना फायदा होईलफार पूर्वीपासून दिवा आणि पनवेलदरम्यान मध्य रेल्वेवर शटल सेवा प्रवाशांच्या सेवेत आहे. कोकण रेल्वेमुळे तर कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया पनवेलचा मागील पंचवीस-तीस वर्षांत संपूर्ण कायापालट झाला आहे. पनवेल आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. तसेच तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, कौसा अशा आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक झालेले आहेत. मध्य रेल्वेची कर्जत/खोपोली, कसारा या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा आहे. नुकताच हार्बर मार्गावरील नेरुळ ते उरण या मार्गावरील नेरुळ-खारकोपरपर्यंतच्या लोकल सेवेचा शुभारंभ झाला. पण दिवा-पनवेल मार्ग मात्र उपेक्षित राहिला. आता तर पेणपर्यंत रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले आहे आणि पनवेल-पेण मेमू सेवा सुरू आहे. पण नागरी वस्ती वाढल्याने मध्य रेल्वेने दिवा-पनवेल-पेण अशी उपनगरीय सेवा चालू केली तर या मार्गावर रेल्वेला चांगले उत्पन्न नक्कीच मिळेल. तसेच कर्जत, कसारा, आसनगाव या भागातून देखील थेट पनवेलपर्यंत उपनगरीय सेवा सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळेल.- अनंत बोरसे, शहापूर, जिल्हा ठाणे.>...तर लोकल झाल्या असत्या उपलब्ध, हिशेब मागामुंबईत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गासाठी आणि आता नेरूळ-उरण या चौथ्या कॉरिडोरसाठी गाड्या सहज उपलब्ध झाल्या. पश्चिम रेल्वेलाही पार डहाणूपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी लोकल मिळाल्या. मग मध्य रेल्वे लोकल मिळवण्यात कमी का पडते? सुरुवातीला जुन्या गाड्या बदलण्यासाठी सीमेन्सच्या लोकल आल्या. आता बम्बार्डियर लोकल आल्या. त्यात या मार्गाचा समावेश केला असता, तर तेथेही सहज लोकल उपलब्ध झाल्या असत्या.- नितीन पाटील, कल्याण
दिवा-पनवेल लोकल तातडीने सुरू करा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 2:07 AM