शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

दिवेकरांचे आरोग्य आले धोक्यात, खाजगी डॉक्टरांचाही असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 2:17 PM

एकीकडे कोरोनाची वाढती धास्ती आणि दुसरीकडे दिव्यात आरोग्य केंद्र नसल्याने येथील नागरीकांची डोकेदुखी वाढत आहे. दोन वर्षापासून आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजुर आहे. परंतु जागा मिळत नसल्याने आरोग्य केंद्र लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता कंटेनेरमध्ये आरोग्य केंद्र सुरु करण्याचा विचार सुरु झाला आहे.

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तिकडे दिव्यात पालिकेचे आरोग्य केंद्र आजही नसल्याची बाब समोर आली आहे. दिव्यात खाजगी स्वरुपात ६१ डॉक्टरांचे क्लिनीक सुरु होते. ते देखील डॉक्टरांनी बंद केल्याची बाब समोर आली आहे. मात्र यातील काहींनी आता आपले क्लिनीक सुरु केले आहे. त्यातही या भागात पाच ठिकाणी आपला दवाखाना सुरु होणार होते. परंतु त्यालाही आता कोरोनामुळे विलंब होणार आहे. त्यामुळे दिव्यातील सुमारे पाच लाख नागरीकांचे आरोग्य आता धोक्यात आले आहे.                 दिव्याची लोकसंख्या पाच लाखांच्या आसपास आहे. परंतु, या ठिकाणी आजच्या घडीला पालिकेचे अधिकृत असे आरोग्य केंद्र नाही. या भागात आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार या भागासाठी सुमारे दोन वर्षापूर्वी आरोग्य केंद्र मंजुरही झाले होते. परंतु अद्यापही ते सुरु झालेले नाही. येथील बहुसंख्या भाग हा सीआरझेडने व्यापलेला असल्याने पालिकेला येथे अधिकृत जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. अधिकृत जागा दाखवा त्यानंतरच आरोग्य केंद्र सुरु होईल असे पालिकेचे म्हणने आहे. खाजगी जागाही अद्याप पालिकेला येथे मिळू शकलेले नाही. अनाधिकृत जागेसाठी पालिका पैसे टाकण्यास तयार नाही. त्यामुळे आरोग्य केंद्राचा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे.दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिव्यात प्रक्टीक करणाऱ्या ६१ डॉक्टरांनी आपले खाजगी क्लिनीकही बंद केले होते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. परंतु बुधवारी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी या डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना क्लिनीक सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार काहींनी क्लिनीक सुरु केले असल्याचे मढवी यांनी सांगितले. तर या भागासाठी देखील ५० पैकी पाच आपला दवाखाना मंजुर झालेले आहेत. त्याचेही काम सुरु होणार होते. परंतु कोरोनामुळे आत ते कामही लांबणीवर पडले आहे. आत हे दवाखाने या भागात केव्हा सुरु होणारे हे अनुत्तरीतच आहे. त्यात प्रभाग समिती अंतर्गत एक आरोग्य केंद्र आहे, परंतु ते देखील शीळ भागात आहे, एवढया लांब जाणे सर्वांनाच शक्य नाही. सध्या तर अशा परिस्थितीत अशक्यच आहे. एकूणच आता दिव्यातील पाच लाख लोकसंख्येपुढे आरोग्य केंद्र नसल्याने आरोग्याचा प्रश्न जटील बनू पाहत आहे.

  • दिव्यात आरोग्य केंद्रासाठी अधिकृत जागा मिळत नाही, अनाधिकृत जागेत काम करण्यास पालिका तयार नाही, त्यामुळे आता या भागात कंटेनरमध्येच आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार पालिकेकडे विचार विनियम सुरु असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल अशी माहिती माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली.
टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdocterडॉक्टर