शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मेट्रोमोनियल साईटद्वारे घटस्फोटीत महिलांना अडीच कोेटींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनास अटक

By जितेंद्र कालेकर | Published: December 16, 2021 4:29 PM

मेट्रोमोनानियल साईटद्वारे (विवाह विषयय संकेतस्थळ) विधवा तसेच घटस्फोटित महिलांशी जवळीक वाढवून त्यांची लग्नाच्या अमिषाने आर्थिक फसवणूक करीत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणाºया प्रजित जोगिश केजे उर्फ प्रजित उर्फ प्रजित टीके (४४, रा. ओडतिनगम माही, पाँडेचेरी) या भामटयाला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाईतब्बल २६ महिलांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मेट्रोमोनानियल साईटद्वारे (विवाह विषयय संकेतस्थळ) विधवा तसेच घटस्फोटित महिलांशी जवळीक वाढवून त्यांची लग्नाच्या अमिषाने आर्थिक फसवणूक करीत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणाºया प्रजित जोगिश केजे उर्फ प्रजित उर्फ प्रजित टीके (४४, रा. ओडतिनगम माही, पाँडेचेरी) या भामटयाला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याने आतापर्यंत २६ महिलांची दोन कोटी ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.ठाण्याच्या ढोकाळी येथील एका महिलेशी आॅगस्ट २०२० ते ११ डिसेंबर २०२१ या दरम्यान एका मेट्रोमोनियल साईटवरून प्रजित या भामटयाने लग्नासाठी संपर्क केला. त्याने पुढे तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक वाढविली. शारिरीक संबंधही ठेवले. आपले पॅरिस येथे हॉटेल असून त्याच्या विक्रीतून मिळालेले पैसे आरबीआयमध्ये अडकले आहेत. ते खाते चालू करण्यासाठी पैशाची नितांत गरज असल्याची बतावणी केली. शिवाय, त्याबदल्यात तिला दुप्पट पैसे देण्याचे खोटे आश्वासन देऊन तिच्याकडून १६ लाख ८६ हजार ९९९ रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी तिने कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलिकडेच बलात्कारासह फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे, निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे आणि सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांच्या पथकाने याबाबतचा तपास सुरु केला. हा ठकसेन परराज्यात वास्तव्यास असून तो अधुनमधुन महाराष्ट्रात आल्यानंतर विविध लॉजेसमध्ये वास्तव्य करीत असे. विधवा, घटस्फोटीत महिलांना गोड बोलून त्यांच्याशी जवळीक साधुन, त्यांच्याकडील क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड घेऊन त्यावरून महागडया वस्तु खरेदी करुन त्याचा कोणताही पुरावा मागे सोडत नसल्याची बाब चौकशीत समोर आली. त्यामुळे त्याचा तपास लावणे हे पोलिसांना आव्हान होते. तो ठाण्यात येणार असल्याची माहिती या पथकाला कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारावर मिळाली. त्याच आधारे प्रजितला ११ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली. त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे.* चौकशीत दिली कबूली-प्रजित याने आतापर्यंत मुंबई, केरळ, बेंगलोर आणि कलकत्ता अशा विविध राज्यांतील तब्बल २६ महिलांची दोन कोटी ५८ लाखांची फसवणूक केल्याची कबूली दिली. त्याने दुप्पट पैसे देण्याचेही आश्वासन देऊन फसवणुक केल्याचेही तपासात उघड झाले. त्याने आणखी किती महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे उपायुक्त राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी