शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

शिधावाटप दुकानातील ‘पॉस’ मशिनचा गैरवापर रोखण्याची दिव्यांग संघटनेची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 2:14 PM

यूसफ खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिधावाटप खात्याच्या वतीने धान्यवाटपामध्ये गैरकारभार होऊ नये, यासाठी पॉस या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे.

ठाणे- शिधावाटप दुकानांमध्ये सध्या पॉस यंत्राचा वापर करुन धान्याचे वाटप केले जात आहे. मात्र, हे वाटप करीत असताना अनेकदा तांत्रिक बिघाड होत आहेत. तसेच, शिधापत्रिकेमधील अनेक नावांचीही गल्लत होत आहे. नवीन शिधापत्रिकाधारकांना आपली शिधापत्रिका लिंक करुन घेताना दुकानदारांकडून शिधावाटप कार्यालयाची वाट दाखविली जात आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानातील पॉस मशिनबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा तसेच शिधापत्रिकेची ऑनलाईन लिंक करण्याची प्रक्रिया शिधावाटप दुकामांमधूनच करण्यात यावी, अशी  मागणी विश्व दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीचे निमंत्रक युसूफ खान यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यूसफ खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिधावाटप खात्याच्या वतीने धान्यवाटपामध्ये गैरकारभार होऊ नये, यासाठी पॉस या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र, या यंत्राच्या वापराबाबत शिधावाटप दुकानदारांकडून चुकीच्या पद्धती अवलंबिल्या जात आहेत. अनेकदा या यंत्राचा वापर करण्याचे टाळण्यासाठी इंटरनेट बंद असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. हे कारण पुढे करुन शिधावाटप दुकानदार मूळ लाभार्थ्याला धान्याचा पुरवठा न करता त्रयस्थाला हे धान्य देऊन त्याद्वारे धान्याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

दुसरीबाब म्हणजे, नवीन शिधापत्रिका ऑफलाईन देण्यात येत असल्या तरी त्या ऑनलाईन पद्धतीने पॉस यंत्राशी लिंक झाल्याशिवाय धान्य देण्यात येत नाही. परिणामी, अनेक लाभार्थ्यांना अनेक वर्ष धान्याचा पुरवठा करण्यात येत नाही. अनेकदा ऑनलाईन झाल्यानंतर शिधापत्रिकांमधील नावांचा घोळ घातला जात असल्याने मूळ लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळत नाही.  केशरी शिधापत्रिकाधारकांनाच धान्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, शिधापत्रिकेमध्ये चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदी दुरुस्त करण्यास गेल्यास त्या दुरुस्त करणेसाठी किमान वर्षभराचा कालावधी घेतला जात आहे.

अधिकार्‍यांकडून चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. त्यातच मुंब्रा येथील शिधावाटप कार्यालयांमध्ये दलालांचे राज्य चालत असल्याने सामान्य माणूस शिधावाटप कार्यालयात गेल्यास त्यांना आपले काम करुन घेता येत नाही. अनेकदा अधिकारी नागरिकांकडून किमान दहा वेळा त्यांची कागदपत्रे मागत आहेत. मात्र, त्यानंतरही शिधापत्रिका देण्यात येत नाहीत.

मुंब्रा येथील शिधावाटप कार्यालय हे पहिल्या मजल्यावर असल्याने दिव्यांगांना तर अशा खेटा मारणे शक्य होत नसल्याने पैसा खर्च केल्यानंतरही न्याय मिळत नाही.  त्यामुळे पॉस यंत्रांचा गैरवापर रोखण्यासाठी संबधित शिधावाटप दुकानदारांना सूचना करण्यात याव्यात; गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करावी; या पूर्वी ऑफलाईन पद्धतीेने देण्यात आलेल्या शिधापत्रिका दोन तासांच्या आत ऑनलाईन लिंक करण्यात याव्यात; तसेच, ऑफलाईन शिधापत्रिका देताना होणारा घोळ रोखण्यासाठी शिधापत्रिकांची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणे