शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
2
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
4
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
5
मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
7
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
8
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
12
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
13
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
15
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
16
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
17
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
19
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
20
Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 

दिवाळीत ध्वनीच्या पातळीत झाली वाढ, मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण मात्र कमी, हवेच्या प्रदुषणातही झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 4:23 PM

दिवाळीच्या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदुषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे ध्वनीच्या प्रदुषणात घट झाली असली तरीसुध्दा मर्यादेपेक्षा ध्वनीची पातळी ११० डेसीबल पर्यंत गेल्याचे आढळलून आले आहे.

ठळक मुद्देशहरातील दोन भागात जास्त ध्वनीप्रदुषणाची नोंदरात्री १० नंतरही वाजले फटाके

ठाणे - न्यायालयाने आदेश दिल्याने त्याचे पडसाद ठाण्यात दिसून आले आहेत. दिवाळी पहाटच्या वेळेस फटाक्यांची आतषबाजी झाली नाही. परंतु उर्वरीत चार दिवसात फटाक्यांची आतषबाजी झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १५ ते २० टक्यांनी कमी झाले आहे. तर ध्वनीची पातळीसुध्दा शहरातील केवळ पाचपाखाडी आणि हिरानंदानी मेडोज येथे ११० डेसीबलपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे हवेची गुणवत्तासुध्दा मागील वर्षीच्या तुलनेत चांगली आढळली असल्याची माहिती महापालिकेच्या प्रदुषण विभागाने दिली आहे.                   यंदा दिवाळीत केवळ रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके फोडावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे पालन दिवाळी पहाटच्या दिवशी झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, पाचपाखाडी, वर्तकनगर, हिरानंदानी मेडोज आदी भागात फटाक्यांची आतषबाजी झाली नसल्याची नोंद बेडेकर यांनी केली आहे. परंतु या कालावधीत ध्वनीची पातळी ही राम मारुती रोड भागात १०० ते १०५ डेसीबल पर्यंत गेली होती. परंतु इतर भागात मात्र हे प्रमाण ९० डेसीबलपर्यंत आढळून आले आहे. दुसरीकडे ७ नोव्हेंबरच्या दिवशी सांयकाळी ७.३० च्या सुमारास राम मारुती रोड या भागात फटाक्यांमुळे ९० डेसीबल पर्यंत ध्वनी प्रदुषण आढळून आले. तर पाचपाखाडी भागात हेच प्रमाण ११० डेसीबल पर्यंत गेले. त्यातही रात्री ११ च्या नंतर आवाजाचे हे प्रमाण १०० डेसीबल पर्यंत गेले होते. तर हिरानंदानी मेडोज मध्ये रात्री ९.३० पर्यंत फटाक्यांच्या आवाजामुळे १०५ डेसीबल पर्यंत ध्वनीची पातळी गेली होती. तर ९.४५ वाजता हिरानंदानी इस्टेट भागात हे प्रमाण १०५ डेसीबल इतके आढळून आले. दरम्यान ८ नोव्हेंबर रोजी राम मारुती रोड येथे फटाक्यांमुळे ध्वनीची पातळी ७५ डेसीबल, पाचपाखाडी भागात ९५ डेसीबल, वर्तकनगर भागात १०० डेसीबल आणि हिरानंदानी मेडोज मध्ये ९५ डेसीबल पर्यंत आढळून आले आहे.                      एकूणच डॉ. बेडेकर यांनी केलेल्या सर्व्हेत मागील वर्षीच्या तुलनेत फटाके वाजविण्याच्या प्रमाणात १५ ते २० टक्यांची घट झाल्याचे आढळून आले आहे. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत अधिक प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली असून यावेळेत आवाजीची तीव्रता ११० डेसीबल पर्यंत गेली होती. त्यातही पाचपाखाडी आणि हिरानंदानी मेडोज भागात हे प्रमाण अधिक आढळून आले आहे.दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाने याच कालावधीत केलेल्या हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या गुणवत्तेच्या चाचणीत हवेतील प्रदुषणात मागील वर्षीच्या तुलनेत काहीशी घट झाल्याचे आढळले आहे. दिवाळी पूर्वी पर्यंत सल्फरडाय आॅक्साईड (एसओटू) चे प्रमाण हे १९ तर दिवाळी दरम्यान हे प्रमाण २५ पर्यंत गेले होते. तर नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण हे आधी ५५ इतके होते. तर दिवाळीच्या कालावधीत ते प्रमाण ६७ वर गेल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण काही अंशी कमी असले तरी सुध्दा मर्यादेपेक्षा जास्तीचे प्रदुषण झाल्याचेही नमुद करण्यात आले आहे. धुलीकणांचे प्रमाणतही निर्धारीत मर्यादेपेक्षा २ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सांयकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधीक म्हणजेच २५५ इतके आढळले आहे. तर नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण ७२ आणि सल्फरडाय आॅक्साइडचे प्रमाण २८ एवढे आढळून आले आहे. परंतु ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढल्याचे प्रदुषण विभागाने स्पष्ट केले आहे. एकूणच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हवेतील प्रदुषणात काही प्रमाणात घट झाल्याचे प्रदुषण विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCrackersफटाके