ठाणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या काही घोषणा केल्या आहेत. त्या लघु उद्योजकांसाठी दिवाळी पूर्वीच पहिली पहाट झालेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत मराठी उद्योजकांनी गरुड झेप घ्यावी असे आवाहन केंद्रीय वाणिज्य, उद्योग तथा नागरी उड्डयण मंत्री सुरेश प्रभु यांनी केले. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या कार्यक्रमाल ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी उद्योजकांना आवाहन केले. मराठी उद्योजक झेप घेऊन पुढे येत नाहीत, ते नेहमीच थोडे घाबरलेले असतात. परंतु आता मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर मराठी उद्योजकांनी यामध्ये मोठी गरुड झेप घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. मराठी माणसाची दिवाळी ही पहिली अंघोळ जेव्हा असते, त्यावेळी खºया अर्थाने दिवाळी सुरु झाली असे मानले जाते. परंतु आता मराठी उद्योजकांची दिवाळीची पहिली पहाट ही आजपासूनच झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केवळ घोषणा केल्या जात होत्या. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने उद्योजकांचा हिरमोड होत होता. आता मात्र केवळ घोषणाच झाली नसून त्याची अंमलबजावणीसुध्दा आजपासून सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. देशाला अडथळा शर्यतीत कधीही गोल्ड मेडल मिळालेले नाही. परंतु लघु उद्योग क्षेत्रातल्या काम करणाºया मंडळींना रोजच्या रोज अडथळ्यांच्या शर्यतीला सामोरे जावे लागते. परंतु ही अडथळ्यांची शर्यत पार करुन लघु उद्योजक यशस्वी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. जर हे अडथळेच नसतील तर लघु उद्योजक किती पुढे जातील, ती संधी आता केंद्र सरकाराने उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योग सुरु करतांना कर्ज मिळत नाही, कर्ज मिळाले तर व्याज परवडत नाही, व्याज परवडले तर बाजारपेठ मिळत नाही, बाजारपेठ मिळाली तर पैसे परत मिळण्यासाठी धडपड सुरु असते. परंतु आता ज्या घोषणा झाल्या आहेत, त्यामुळे या सर्व अडचणी दुर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मला दिल्लीला थांबण्यासाठी सांगितले होते. परंतु मी ठाण्याची निवड केली. ठाण्यात आल्यावर प्रवास पूर्ण होतो असे बोलले जाते. त्यानुसार ठाण्यात आल्यावर आता आमचे देखील उद्दीष्ट खºया अर्थाने पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या समवेत भिवंडीचे खासदार कपील पाटील, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक महेश महाबळेश्वरकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
लघु उद्योजकांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आजपासूनच सुरु - सुरेश प्रभु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 7:43 PM
मराठी उद्योजकांसाठी आजपासूनच दिवाळी सुरु झाली असून, त्यांनी मोदींनी केलेल्या घोषणेचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.
ठळक मुद्देमराठी उद्योजकांना संधीमराठी उद्योजकांची अडथळ्यांची शर्यत दूर