शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

मराठी येत नाही, इंग्रजीत ट्विट करा

By admin | Published: July 17, 2017 1:17 AM

रेल्वेच्या खास करून पश्चिम रेल्वेच्या कारभारात मराठी कशी डावलली जाते, याचे प्रत्यंतर मराठी एकीकरण समितीला आले असून

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : रेल्वेच्या खास करून पश्चिम रेल्वेच्या कारभारात मराठी कशी डावलली जाते, याचे प्रत्यंतर मराठी एकीकरण समितीला आले असून मराठीचा वापर वाढण्यासाठी केलेल्या ट्विटला उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याने चक्क इंग्रजी किंवा हिंदीत ट््िवट करण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी थेट रेल्वेमंत्र्यांनाच ट्विट करून संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना जर मराठी येत नसेल, तर मराठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या केंद्रीय सोशल मीडिया विभागात अथवा जनसंपर्क कार्यालयात नेमावे, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. रेल्वेच्या कारभारात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मराठी एकीकरण समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. तिचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मराठी भाषेचा वापर राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांत प्राधान्याने करण्याबाबत त्या-त्या विभागांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यात रेल्वे अग्रेसर आहे. पश्चिम रेल्वेने तर भार्इंदर रेल्वे स्थानकाचे भायंदर असा नामोल्लेख असलेले फलक नव्याने रंगवण्याची तसदीही घेतलेली नाही. तिकिटांवरही मराठीचा वापर होत नाही. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यावर त्याच्या अपिलासाठी थेट दिल्लीला जाण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे. रेल्वेच्या कारभारात त्रिभाषा सूत्राचा वापर करण्याच्या सूचना असूनही मुंबईत, महाराष्ट्रात मराठीला डावलले जात असल्याबद्दल देशमुख यांनी संपात व्यक्त केला. रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे मराठीला कारभारात प्राधान्य मिळत नसल्याने समितीच्या सदस्यांनी थेट रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटरवरच ‘हल्ला’ केला, पण तेथेही अधिकाऱ्यांनी त्यांना हिंदी किंवा इंग्रजी भाषेतूनच ट्विट करण्याचा सल्ला देत जखमेवर मीठ चोळले आहे.