शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

देशाला गुलाम करणारा विकास नको, भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया!

By अजित मांडके | Published: July 30, 2023 12:08 AM

ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर, भाजपच्या हिंदुत्वावरही सडकून टीका

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: देश कोणत्याही एका व्यतीचा असू शकत नाही, आम्हाला विकास हवा आहे,मात्र देशाला गुलाम करणारा विकास आम्हाला नको,२०२४ ला जर बदल केला नाही तर देश नालायक लोकांच्या हातात जाईल अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी हिंदी भाषिकांना केले. माता भगिनींची इज्जत लुटली जात आहे मात्र हे सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे. देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी महिला असून मणिपूरच्या घनतेबाबत त्यांचीही  संवेदनशीलता नाही असे टीकास्त्रही  देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर ठाकरे यांनी सोडले.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी खा. राजन विचारे यांच्या वतीने हिंदी भाषिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या हिंदुत्वावरही सडकून टीका केली आहे. जे एकमेकांमध्ये भेद करतात त्याला हिंदुत्व म्हणत नाही ,काही लोक हेच काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले. हिंदुत्वाची व्याख्या काय ? मी काँग्रेस सोबत गेलो , पण काँग्रेस सोबत जाण्यासाठी कोणी मजबूर केलं, २५ वर्ष भाजप सोबत होतो त्यांनीच युती तोडली त्यामुळे  आपल्याला घंटा बडवणारा हिंदू नको तर आतंकवाद मिटवणारा हिंदू हवा आहे. खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा काढ्याचा आहे.  मणिपूर जळतंय हेच  हिंदुत्व आहे का ?आजचे  सरकार द्रुतराष्ट्राची भूमिका बजावत आहे , देशाच्या  राष्ट्रपती आदिवासी  महिला आहे , त्यांना काही संवेदना नाही, आमच्याकडे राज्यपाल होते त्यांना तिकडे पाठवा. मणिपूरला शांती करायची असेल तर तिकडे ईडी पाठवा बघा शांत होतंय का ? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

माझी लढाई मोदींशी नाही तर तानाशाहीशी आहे, आधी मुगल आले, नंतर इंग्रज आले , आता घरातले आले आहेत , गुलामी गुलामी असते भारत माते ला गुलाम होताना पाहणार नाही. आम्हाला विकास हवा आहे पण गुलाम बनवणारा विकास नको आहे. २०२४ ला जर बदल आणला नाही तर देश नालायकांच्या हातात जाईल त्यामुळे भारत मातेला आझाद ठेवण्याची शपथ घेऊया असे आवाहन ठाकरे यांनी हिंदी भाषिकांना केले. इंडियाची आलोचना करत इंडियन  मुझ्झआयदिन  अशी केली , आम्ही काय अंतकवाडी आहोत का ?मग मोदी जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन भारतचे प्रतिनिधित्व करतात तेव्हा ते इंडियाचे प्रतिनिधित्व करतात मग ते सुद्धा आतंकवादी झाले का असा टोला ठाकरे यांनी लगावला. राम मंदिर बनले  ते काय मोदीने नाही बनवले , कोर्टाच्या निर्णयाने झाले आहे. अयोध्येला गेलो तेव्हा एक कायदा बनवा आणि राम मंदिर बनवा अशी मागणी मी केली होती. दुसऱ्या पक्षात  असला तर गाळ आणि  भाजप मध्ये आला तर कमळ  अशी टीकाही त्यांनी केली.

गडकरी रंगायतन ही बाळासाहेबांची देण आहे. नाट्यग्रुह आम्ही दिलं पण नाटक दुसरेच कोणी करत आहेत , मार्केट मध्ये चायनीज बाहुल्या आल्या आहेत ,शिवसेना पेक्षा वर जाऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा तेव्हाच असते ते जेव्हा परिस्थिती कठीण असते त्यामुळे याला मी संधी मनात आहे. मी जर उत्तर भारतीयांसाठी काहीच केलं नसते तर एवढ्या संख्येने लोकं आलेच नसते त्यामुळे ही एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

ठाणे म्हणजे निष्ठा - संजय राऊत

जे ठाणे शहर नुसतं ठाण्याचं नाव काढलं तरी  बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाने रोमांच उठतात. ठाणे शहर म्हणजे निष्ठा, आज तीच निष्ठा गडकरींच्या पून्हा दिसली. काही लोकांना ठाणे सोडून पाळावे लागेल असे वातावरण आहे . ठाणे हे मर्दांचं शहर आहे , डरपोकांचं  शहर कधी ऐकलं नाही संकट आल्यावर जो पळून जातो तो नामर्द असतो अशी टीका यावेळी खा. संजय राऊत यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचार