शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ताकद दाखवायला लावू नका- प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 6:28 AM

प्रताप सरनाईकांचा पलटवार : लोकांची भावना समजत नसलेल्यांनी राजकारण करू नये

ठाणे : नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चात मी फक्त सहभागी झालो होतो. मूठभर मतांसाठी लाचार होण्यापेक्षा शेकडो लोकांना काय हवे हे समजत नसेल तर अशा व्यक्तींनी राजकारण करुच नये, असा पलटवार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शनिवारी केला.कोणाची वैयक्तिक ताकद किती आहे, हे दाखविण्याची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांना दिला. ज्या लोकांनी मते देऊन तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणले आहे, त्यांची कामे करण्याऐवजी तुम्ही सुपारी वाजविण्याची कामे करीत आहात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.नीळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या स्मशानभूमीचा मुद्दा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निकाली निघाला आहे. त्यामुळे पुन्हा महासभेत स्मशानभूमीबाबत चर्चा होणे अतिशय चुकीचे होते. त्यातही शिवसेनेच्याच काही लोकप्रतिनिधींनी पुन्हा स्मशानभूमीच्या ठरावाला मंजुरी देणे हा एकनाथ शिंदे यांचा अपमान असल्याचे खडे बोल सरनाईक यांनी म्हस्के यांचे नाव घेता सुनावले. हा पक्षाचादेखील अपमान असल्याने पालकमंत्री याची गंभीर दखल घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.नीळकंठ आणि रेप्टॉकासच्या जागेवरील स्मशानभूमीच्या वादाची राख शमली असतानाच शुक्रवारच्या महासभेत विरोधकांनी पुन्हा त्यात ठिणगी टाकल्याने हा वाद भडकला. रेमंडच्या जागेवर स्मशानभूमीबाबतचा ठराव पुन्हा मांडला गेला. त्यामुळे संतप्त झालेले सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी त्याला मंजुरीही दिली. ती देत असतानाच त्यांनी विरोधकांसह स्वकीयांचाही समाचार घेतला. गिदड की मौत आती है तब बो स्मशान की तरफ दौडता है, अशी टिप्पणी करत त्यांनी सरनाईक यांच्यावर शरसंधान केले. मी पक्ष बदलून आमदार झालेलो नाही, असे सांगत पक्षाशी एकनिष्ठ असल्याची ग्लाही देत बाहेरून आलेल्यांबाबतच्या संतापाला मोकळी वाट करून दिली होती. त्यामुळे त्यावर आमदार सरनाईक काय बोलतात याबाबत उत्सुकता होती. पण पक्षश्रेष्ठीच याबाबत योग्य निर्णय घेतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.मूळात नीळकंठ तसेच रेप्टॉकॉसच्या जागेची मागणी आम्ही केलीच नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. ज्या लोकांनी मतदान करुन निवडून दिले, त्यांची कामे न करता काही जण सुपारी वाजविण्याची कामे करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पक्षातील चर्चेनंतर पुन्हा रेमंडच्या जागेचा ठराव करणे हा पालकमंत्र्यांचाच अपमान आहे आणि तो देखील आपल्याच पक्षातील नगरसेवकांनी अशा पध्दतीने अनुमोदन देत मंजूर केला असेल तर तोही एकप्रकारे पक्षश्रेष्ठींविरोधात जाऊन स्वत:चीच भूमिका मांडल्यासारखा आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री घेतीलच, अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली.आता या विषयावरून पुन्हा कोणाची वैयक्तिक ताकद किती आहे, हे दाखविण्याची वेळ आणू नका, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हस्के यांना दिला. केवळ मूठभर मतांसाठी लाचार होण्यापेक्षा शेकडो लोकांना काय हवे, हे देखील समजत नसेल तर अशा व्यक्तींनी राजकारण करुच नये, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.यात नक्कीच काही अर्थकारण शिजत असणारस्मशानाच्या बैठकीला बोलावले नाही, असे जर आता कोणी म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. मी प्रत्येकाला बोलावले होते. आमदार केळकर यांचादेखील मला फोन आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.च्या बैठकीत वादावर पडदा पडला असतांना पुन्हा महासभेत हा विषय चर्चेला येतोच, कसा असा सवाल उपस्थित करुन त्यांनी यात काही तरी अर्थकारण नक्कीच शिजत असेल, असा गंभीर आरोप केला. आतापर्यंत जेवढे स्मशानभूमीचे प्रस्ताव पुढे आले, ते कागदावरच राहिले आहेत. आता कुठे स्मशानभूमीबाबत प्रशासन योग्य पावले उचलतांना दिसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना