शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

...अन्यथा कचरा उचलू नका!

By admin | Published: March 08, 2016 1:40 AM

ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या नोटीसांना शहरातील गृहसंकुलांनी केराचीच टोपली दाखविली आहे. जी गृहसंकुले कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्रवेशद्वारजवळ ठेवत नसल्यास

भार्इंदर : ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या नोटीसांना शहरातील गृहसंकुलांनी केराचीच टोपली दाखविली आहे. जी गृहसंकुले कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्रवेशद्वारजवळ ठेवत नसल्यास त्यांचा कचराच उचलू नका, अशी सक्त ताकीद आयुुक्त अच्युत हांगे यांनी स्वच्छता विभागाला दिली आहे. त्यासाठी लेखी आदेश हवा असल्यास तसे पत्र सादर करुन माझी सही घ्या, असा सल्लाही आयुक्तांनी विभागाला दिला आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरातील गृहसंकुलांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या नोटीसा नुकत्याच बजावल्या आहेत. तसे न केल्यास नळ जोडणी तोडण्याचा फतवा काढला आहे. याची अंमलबजावणी पालिकेने सुरु केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करुनच त्याची विल्हेवाट लावण्याची सूचना सफाई कंत्राटदारांना करारानुसारच केलेली आहे. या सूचनेला अद्याप एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद न देता त्याला पायदळीच तुडविल्याचे प्रत्येकवेळी दिसून आले आहे. नागरीकांमध्येही याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण न करता एकत्रित कचराजमा करुन गृहसंकुलाबाहेर ठेवतात. कचऱ्याचे वर्गीकरण उत्तनकरांचा तेथील डम्पिंग ग्राऊंडला असलेल्या विरोधातून पुन्हा चर्चेत आले आहे. उच्च न्यायालयानेही उत्तनकरांच्या नागरी हक्क समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने तसेच वर्गीकरण करुनच डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्याची तात्पुरती परवानगी पालिकेला दिली आहे. त्यामुळे पालिकेने येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये केवळ ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेत सुका कचऱ्यासाठी तेथीलच एका शेडसह इतरत्र सोय केल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)