डोंबिवली : रिक्षाचालक म्हटले की उद्धट भाषा, गैरवर्तणूक तसेच नकारघंटा वाजवणारे, असे चित्र प्रवाशांना नेहमीच अनुभवायला मिळते. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाणे सोयीचे व्हावे, यासाठी येथील लालबावटा रिक्षा-चालक-मालक युनियन या संघटनेने पुढाकार घेतला आहे. परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना नकार देऊ नका, तसेच त्यांच्याकडे पैसे नसल्यास मोफत केंद्रावर पोहोचवा. त्याचे भाडे युनियनच्या कार्यालयातून दिले जाईल, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी रिक्षाचालकांना केले आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. तर, दहावीची परीक्षा १ मार्चला सुरू होणार आहे. जे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी रिक्षाचा वापर करतात, त्यांच्यासाठी ‘लालबावटा’ने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन रिक्षाचालकांना केले आहे. रिक्षाचालकांनी विद्यार्थ्यांना सेवा देण्यास कोणत्याही परिस्थितीत नकार देऊ नये, आपल्याला काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांना दुसºया रिक्षात बसवून द्यावे. जर विद्यार्थी पैसे विसरले असतील आणि कोणाकडे पैसे नसतील, तर त्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवासीसेवा द्यावी. त्या विद्यार्थ्याचे भाडे लालबावटा युनियनच्या कार्यालयातून दिले जाईल, असे जाहीर फलक रेल्वेस्थानक परिसरात लावले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस युवकचाही पुढाकारपरीक्षेबाबत काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क करा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बारावीच्या विद्यार्थ्यांना केले आहे. राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाºयांनी त्यांचे मोबाइल क्रमांक सोशल मीडियावर टाकले आहेत. तसेच विभाग व महाविद्यालय स्तरावर प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक जाहीर केले आहेत, अशी माहिती कल्याण पूर्वविधानसभा अध्यक्ष अनमोल गवळी यांनी दिली.टीएमटी बसभाड्यात सवलतलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील एचएससी, एसएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत टीएमटीच्या बसभाड्यात ५० टक्के विशेष सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला.एचएससी परीक्षा गुरुवारपासून सुरूझाली आहे. तर, दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना टीएमटीच्या प्रवासभाड्यात विशेष सवलत देण्यात येत आहे. या परीक्षा कालावधीत पासधारक विद्यार्थ्यांचे बसपास त्यांचे निवासस्थान ते परीक्षा केंद्र यादरम्यान ग्राह्य मानले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे बसपास नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या प्रवेशावरील शाळेचा शिक्का पाहून संबंधित विद्यार्थी महापालिका शाळेचा विद्यार्थी असल्याची खात्री करून त्यांना पूर्ण प्रवासभाडे न आकारता ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. इतर शाळांमधील मुलांनासुद्धा हीच सवलत लागू असणार आहे.गर्दीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तत्काळ बस मिळावी, याकरिता गर्दीच्या बसथांब्यांवर अधिकारी, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात येणार आहे. शालेय व्यवस्थापनाकडून काही सूचना आल्यास अतिरिक्त बसचीदेखील सोय करण्यात येणार आहे.