शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

नको कुबडी युतीची, करा तयारी भाजपा विजयाची

By admin | Published: January 13, 2017 6:50 AM

प्रदेशपातळीवर युतीबाबत सकारात्मक वारे वाहू लागले असतानाच ठाण्यात मात्र भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या

ठाणे : प्रदेशपातळीवर युतीबाबत सकारात्मक वारे वाहू लागले असतानाच ठाण्यात मात्र भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या परिसरात लावलेल्या आम्ही ठाणेकरच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ठाण्यातील भाजपाच्या एका गटाने युती नको विकास हवा, ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवे, मोदी-फडणवीसांचा कारभार ठरला राज्यात नंबर वन, नको कुबडी युतीची करा तयारी एकहाती भाजपाच्या विजयाची, एकटे लढा ठाण्यातही व्हा नंबर वन, युती नाकारा, ठाण्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा, अशा आशयांचे बॅनर लावले होते. यातून ठाण्यातील भाजपाच्या एका गटाने युती नको, असाच संकेत दिल्याचे दिसले. परंतु, हे बॅनर कोणी लावले, याबाबत मात्र भाजपा नेत्यांनी कमालीची गुप्तता राखली.ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा यापूर्वीच शहर भाजपाने दिला होता. निवडणुकीची आचारसंहिता लागताच शिवसेनेने दिलेल्या टाळीला होकार देऊन भाजपानेदेखील ठाणे, मुंबईतील युतीचा निर्णय घेण्याचे संकेत देत उर्वरित ठिकाणांचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी घेतील, असे जाहीर केले. त्यामुळे ठाण्यात आता युती होणार, हे जवळजवळ निश्चित मानले जात होते. परंतु, प्रदेशने घेतलेल्या या निर्णयावर स्थानिक पातळीवरील काही मंडळींनाही ही बॅनरबाजी करून श्रेष्ठींना द्यायचा तो संदेश दिला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार संजय केळकर यांनीदेखील स्वबळाचा नारा दिला होता. दरम्यान, बुधवारी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आणि गुरुवारी ठाण्यात भाजपामध्ये पोस्टरयुद्ध सुरू झाले. बॅनर कुणी लावले?च्विशेष म्हणजे काळ्या रंगाच्या बॅनरखाली आम्ही ठाणेकर एवढेच लिहिण्यात आले होते. त्यामुळे ते नेमके लावले कोणी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला होता. च्यासंदर्भात शहर भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ती एका समूहाची भावना आहे. जी त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे. परंतु, हे बॅनर कोणी लावले, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.